कोरोना पॉझिटिव्ह म्हटल्यावर...घरचांची एकच रडारड...पण, सावरणार तरी कसं?..साधं जवळ ही जाता येईना!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

अचानक घशाला खवखव जाणवू लागली म्हणून तपासणी करुन घेतली. अन् त्याच दिवशी रविवारी बेमोसमी पावासाचे वातावरण अन्‌ विजांचा कडकडाट सुरू असल्याने जणू निसर्गाने येणाऱ्या संकटाची कल्पनाच दिल्याचा अनुभव आला. फोनची घंटी वाजली...अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळले... सोबत असूनही सावरता येईना अशी त्यांची स्थिती झाल्याचे 'ते' म्हणाले. 

नाशिक : (बागलाण) अचानक घशाला खवखव जाणवू लागली म्हणून तपासणी करुन घेतली. अन् त्याच दिवशी रविवारी बेमोसमी पावासाचे वातावरण अन्‌ विजांचा कडकडाट सुरू असल्याने जणू निसर्गाने येणाऱ्या संकटाची कल्पनाच दिल्याचा अनुभव आला. फोनची घंटी वाजली...अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळले...सोबत असूनही सावरता येईना अशी त्यांची स्थिती झाल्याचे 'ते' म्हणाले. 

कुटुंबिय डोळ्यांसमोर उभे राहून डोके सुन्न... 

मी डॉ. अमोल पाठक, वैद्यकीय अधिकारी म्हणून बागलाण तालुक्‍यात मागील दहा वर्षांपासून साल्हेर, मुल्हेर, अलियाबाद, ताहाराबाद येथे सेवा देत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचे विलगीकरण, तपासणी, तालुक्‍याचे रिपोर्टिंग ही काम करताना मला अचानक घशाला खवखव जाणवू लागली. त्यामुळे 9 मेस ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी दिले. काळजी म्हणून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घरी विलगीकरणात राहात असताना अचानक 10 मेस तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन करून रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळविले. त्या दिवशी रविवारी बेमोसमी पावासाचे वातावरण अन्‌ विजांचा कडकडाट सुरू असल्याने जणू निसर्गाने येणाऱ्या संकटाची कल्पनाच दिल्याचा अनुभव आला. आमचे एकत्र कुटुंब असून वृद्ध आई-वडिलांसह दोन नवजात बालकंही डोळ्यांसमोर उभे राहून डोके सुन्न झाले. 

हेही वाचा > जिवंतपणीच पसरली निधनाची अफवा...अन् पायाखालची जमीनच सरकली...पण...

हाता-पायातील त्राण निघून गेले. परंतु थोड्या वेळाने मी स्वतःला सावरत धीर एकवटून घरच्यांना कल्पना देताच एकच रडारड सुरू झाली. कुटुंबात असूनही त्यांना सावरण्यास जवळ जाणेही शक्‍य नव्हते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी वेळोवेळी मानसिक आधार दिल्यामुळेच मी जगू शकलो.  

हेही वाचा > मित्राचा फोन आला अन् धडकीच भरली...'आहे तिथंच थांब तुला घ्यायला गाडी येतेय'...अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical officer of Baglan taluka Dr. Amol Pathak defeated Corona nashik marathi news