वैद्यकीय पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी मुदतवाढ

अरुण मलाणी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

या संदर्भात विद्यापीठातर्फे परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य, पोषणशास्त्र, आरोग्यसेवा व्यवस्थापन व औषधनिर्मिती क्षेत्रातील नावीण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमएससीइन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्‍या परिस्‍थितीमुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नावीण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्‍या परिस्‍थितीमुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्‍यानुसार १४ ऑगस्‍टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या संदर्भात विद्यापीठातर्फे परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य, पोषणशास्त्र, आरोग्यसेवा व्यवस्थापन व औषधनिर्मिती क्षेत्रातील नावीण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. एमबीए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रवेशाकरिता आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी. नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्रमाचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

अर्ज करण्यासाठी सुधारित मुदत १४ ऑगस्‍टपर्यंत

एम. एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन अभ्यासक्रमासाठी आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी, तसेच बी. एस्सी., बी. फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सुधारित मुदत १४ ऑगस्‍टपर्यंत असेल. तर प्रवेश अर्जासह अन्‍य आवश्‍यक कागदपत्रे विद्यापीठात पोच करण्यासाठीची मुदत २१ ऑगस्‍टपर्यंत असणार आहे.  

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical postgraduate courses Extension till 14 for application nashik marathi news