PHOTOS : "तो' स्वतःला गाडगे महाराज म्हणवतो' ..स्वच्छता निरीक्षकांचा अजब खुलासा 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

"तो' विजय कदम नामक मनोरुग्ण आहे. त्याच्या पायाला मोठी जखम असून संसर्गजन्य कक्षात दाखल असतो. मनोरुग्ण असलेला कदम "मी गाडगे महाराज आहे', असे म्हणत रुग्णालयाचा परिसर झाडतो. स्वतःच्या मर्जीने मेडिकल वेस्टचा कचऱ्याचे विलगीकरण करतो. त्याला कोणीही सफाई कामगार काम सांगत नसल्याचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक डी. पी. पवार यांनी खुलासा पत्रात म्हटले आहे. 

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील मेडिकल वेस्ट कचऱ्याचे विलगीकरण करणारा भिकारी हा मनोरुग्ण असून, तो स्वतःला गाडगे महाराज म्हणवतो. तो त्याच्या मर्जीनेच रुग्णालयाच्या आवारात झाडू मारतो, कचऱ्याचे विलगीकरण करतो. सफाई कामगार त्याला काम सांगत नाहीत, असा अजब खुलासा जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केला आहे. प्रत्यक्षात, मनोरुग्ण असतानाही अशा घातक मेडिकल वेस्ट कचऱ्याकडे तो जातोच कसा, असा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहतो आहे. दरम्यान, सफाई कामगारांना पाठीशी घालणाऱ्या याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सकांना अनपेक्षित खुलासापत्र

"सकाळ'च्या मंगळवार (ता. 11)च्या अंकात "मेडिकल कचऱ्याच्या विलगीकरणासाठी भिकाऱ्याचा वापर' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी घेतली आहे. त्यासंदर्भात रुग्णालयाचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक डी. पी. पवार यांनी संबंधित सफाई कामगारांची चौकशी करून त्यांच्यावरील कारवाईसंदर्भात माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देणे अपेक्षित होते. परंतु स्वच्छता निरीक्षकांनीच सफाई कामगारांना पाठीशी घालत, अवघ्या काही मिनिटांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांना अनपेक्षित खुलासापत्र दिले. संबंधित खुलासापत्र वाचल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनाही वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाच्या "चलाखी'ची प्रचीती आली. 

हेही वाचा > सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार! भिकारीकडून 'हे' कसलं काम करून घेतलं जातयं?

Image may contain: outdoor

...असा आहे खुलासा 
"तो' विजय कदम नामक मनोरुग्ण आहे. त्याच्या पायाला मोठी जखम असून संसर्गजन्य कक्षात दाखल असतो. मनोरुग्ण असलेला कदम "मी गाडगे महाराज आहे', असे म्हणत रुग्णालयाचा परिसर झाडतो. स्वतःच्या मर्जीने मेडिकल वेस्टचा कचऱ्याचे विलगीकरण करतो. त्याला कोणीही सफाई कामगार काम सांगत नसल्याचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक डी. पी. पवार यांनी खुलासा पत्रात म्हटले आहे. 

Image may contain: possible text that says 'ससकारक मेडिकल कचऱ्याच्या विलगीकरणासाठी भिकाऱ्याचा वापर सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार; सफाई कामगारांची अजब शक्कल'
मनोरुग्ण कसा करेल कचऱ्याचे विलगीकरण? 
मनोरुग्ण असलेला व्यक्ती मेडिकल कचऱ्याचे विलगीकरण कसा करू शकेल, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. दरम्यान, ती व्यक्ती मेडिकल कचऱ्याचे विलगीकरण व कचरा वाहून नेतानाचे छायाचित्र व व्हिडिओही "सकाळ'कडे आहेत. त्यावरून तो मर्जीने कचरा विलगीकरणाचे काम करीत असावा, असे वाटत नाही. तसेच मेडिकल कचऱ्यामध्ये घातक साहित्य असताना, त्यात तो स्वतः संसर्गजन्य रुग्ण आहे. तरीही सफाई कामगारांच्या ही बाब लक्षात येऊ नये का, असाही प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 
 

Image may contain: one or more people and food

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

मनोरुग्णाकडून कचऱ्याचे विलगीकरण करणे चुकीचे आहे. त्यासाठी सफाई कामगार असताना असे गैरप्रकार होत असेल तर निश्‍चितपणे ठोस कारवाई केली जाईल. - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical waste disposal case of Nashik civil hospital Marathi News