esakal | पिंपळगाव बसवंतला बैठक निष्फळ; कांदा साठवणुकीचे निर्बंध मागे घेईपर्यंत लिलाव बंद
sakal

बोलून बातमी शोधा

pimpalgaon baswant meeting

कांदा व्यापाऱ्यांकडे आधीच खरेदी करून ठेवलेला माल आहे. त्यामुळे साठवणूक मर्यादेचा लादलेला निर्णय मागे घेण्याची गरज आहे. निर्णय मागे घेईपर्यंत नवीन माल खरेदी करणार नसल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 

पिंपळगाव बसवंतला बैठक निष्फळ; कांदा साठवणुकीचे निर्बंध मागे घेईपर्यंत लिलाव बंद

sakal_logo
By
दीपक आहिरे

नाशिक/पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत होण्यासाठी सभापती आमदार दिलीप बनकर, सहकार विभागाचे अधिकारी व व्यापारी यांच्यात मंगळवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. केंद्र सरकार साठवणुकीचे निर्बंध मागे घेईपर्यंत लिलाव सुरू करणे अशक्य असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.

बैठकीस जिल्हा निबंधक सतीश खरे, बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे, कांदा व्यापारी शंकर ठक्कर, हिरालाल पगारिया, सुरेश पारख, अतुल शहा, दिनेश बागरेचा, हरीश ठक्कर, विलास नीळकंठ, महावीर भंडारी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


कांदा व्यापाऱ्यांकडे आधीच खरेदी करून ठेवलेला माल आहे. त्यामुळे साठवणूक मर्यादेचा लादलेला निर्णय मागे घेण्याची गरज आहे. निर्णय मागे घेईपर्यंत नवीन माल खरेदी करणार नसल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 
-दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 

शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा लिलाव सुरू करणे आवश्यक आहे. लिलावात सहभागी होण्याच्या व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्या अडचणींबाबत शासनाला माहिती पाठविणार आहोत. 
-अभिजित देशपांडे, सहाय्यक निबंधक, निफाड 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ