PHOTO : छगन भुजबळ यांनी "असे" काही केले!...उपस्थितांपैकी अनेकांनाही जमले नाही..उपस्थित चकीत!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

युवक व उपस्थितासांठी आयोजित एका कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र  या दरम्यान केवळ भाषण देऊन न थांबता छगन भुजबळ यांनी असे काही करून दाखवले आणि उपस्थित मात्र चकित झाले..

नाशिक : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे येवला येथे शनिवारी सायंकाळी संगीतमय योगासनांचा कार्यक्रम होता. युवक व उपस्थितासांठी आयोजित एका कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र  या दरम्यान केवळ भाषण देऊन न थांबता छगन भुजबळ यांनी असे काही करून दाखवले आणि उपस्थित मात्र चकित झाले..

छगन भुजबळ यांचा "संगीतयोगा"...उपस्थितही चकीत!

नागरीकांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. नियमीत योगासने करावीत असा संदेश देण्यासाठी संस्थेने हा कार्यक्रम केला होता. मात्र कार्यक्रमाच्या आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे केवळ भाषण देऊन न थांबता छगन भुजबळ प्रत्यक्ष योगाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. त्यांनी युवकांसमवेत योग केला. आणि उपस्थित मात्र चकित झाले..

Image may contain: 1 person, standing

एक आक्रमक नेते व प्रभावी वक्ते

मंत्री छगन भुजबळ हे एक आक्रमक नेते, प्रभावी वक्ते म्हणून सर्वांनाच परिचीत आहेत. मात्र, शनिवारी त्यांनी आपल्या मतदारसंघातील संगीतमय योगासनांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चक्क व्यासपीठावर युवकांसोबत संगीतमय योग केला. उपस्थितांतील अनेकांना जे जमले नाही ते भुजबळ यांनी लिलया केल्याने त्यांची व्यायामाची आवड या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली. मुंबईच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण करतांना छगन भुजबळ यांनी त्याला साजेशे व्यक्तीमत्व देखील घडवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी अनेक प्रयोग केल्याचे कार्यकर्त्यांना ठाऊक आहेत.

नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!

चित्रपटात अभिनय देखील..

चित्रपट निर्मीतीपासून तर चित्रपटात अभिनय देखील केला आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादाच्या आंदोलनात प्रवेशबंदी असतांना ते चक्क वेगळा वेष करुन बेळगावला दाखल होत कर्नाटक सरकारला धक्क दिला होता. नाशिकला राम रथयात्रेत सहभागी होण्यास बंदी असताना वेषांतर करुन ते त्यात सहभागी होत पोलिसांनाही त्यांनी चकवा दिला होता. अनेकदा आपल्या शैलीदार भाषणात ते अनेक नेत्यांची मिमिक्री करतात. हे सर्व नवे नाही. मात्र, सत्तरीतही आरोग्याच्या समस्या असताना त्यांची आजही व्यग्र दिनचर्या असते. त्याचे रहस्य त्यांच्या व्यायामाच्या आवडीत आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हेही बघा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chagan Bhujbal did SangeetYoga surprised people Nashik Marathi News