...अन् अल्पवयीन मुलीला ढकलले अनैतिक व्यवसायात.. मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती!

girl chatka.jpg
girl chatka.jpg

नाशिक : कुठलाही कौटुंबिक आधार नसल्याने बघत, फुस लावत अल्पवीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेतांनाच पीडीतेला अनैतिक व्यवसायात कसे ढकलले. मुलीने केला धक्कादायक खुलासा.. 

पीडितेने पोलिसांना सांगितली आपबिती

जानेवारी 2019 मध्ये आलीशाने कुटुंबियांचा आधार नसल्याचे पाहिले. प्रसंगाचा फायदा उचलत मुलीसारखा सांभाळ करेल, असे गोड बोलतांना उंटवाडीतील निरिक्षण गृहाच्या समोरून पीडीतेला खाण्यातून गुंगीचे औषध दिले. यानंतर तिघांनी पीडीतेवर अत्याचार केला. ठार मारण्याची धमकी देतांना वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचेही पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. क्रुरतेचा कळस करत, संशयीतांनी पीडीतेला अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिला विविध ठिकाणी पाठविण्यात आले. आपली विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजल्यानंतर पीडीतेने पळ काढत भद्रकाली पोलिस ठाणे गाठत आपली आपबिती सांगितली.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुठलाही कौटुंबिक आधार नसल्याने बघत, फुस लावत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेतांनाच पीडितेला अनैतिक व्यवसायात झोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये महिलेचाही समावेश आहे.या घटनेत पीडितेने संशयीत आलीशा उर्फ सुलत्ना, गणेश, जयेश जाधव, सज्जो, शब्बी, हाजरा (रा. पंचशीलनगर) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळात अडकवत अत्याचार
आणखी एका घटनेत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळात अडकवत अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून पीडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर संशयीतांची बनावटगिरी उघडकीस आली आहे. असीफ बशीर शेख (19, रा. धात्रक फाटा) असे गुन्ह्यातील संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतांना तिच्यावर जबरदस्ती वेळोवेळी अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर पीडीतेच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोस्को व अनुसुचीत जाती जमाती अधिकनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com