
केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काही शाळांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नसताना संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज परस्पर दाखल झाल्याचे पडताळणीत उघडकीस आले आहे.
नाशिक : केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काही शाळांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नसताना संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज परस्पर दाखल झाल्याचे पडताळणीत उघडकीस आले आहे.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेत बोगस अर्ज?
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थ्यांचे बोगस अर्ज भरून शासनाची फसवणूक होत असते. त्यामुळे जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये, या उद्देशाने अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभाग शिक्षक संचालक सुनील चौहान, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी नाशिक जिल्ह्यातील तीन शाळांमध्ये जाऊन पडताळणी केली. यात दोन्ही शाळांनी या योजनेत आम्ही अर्ज सादर केले नसल्याचे सांगितले. मात्र, नॅशनल शिष्यवृत्ती संकेतस्थळावर या शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाल्याचे पडताळणीत उघड झाले. हे अर्ज बोगस असल्याचा अंदाज व्यक्त करत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ५ फेब्रुवारीपर्यंत पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी केल्या आहेत.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
तपासणी शासकीय नियमांप्रमाणे करण्याच्या सूचना
त्यामुळे पडताळणी पथकाने तत्काळ जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना ५ फेब्रुवारी २०२१ अखेर अर्ज केलेले विद्यार्थी हे आपल्या शाळेचे आहेत का, याची शहानिशा करत त्यांच्या पालकांचे उत्पन्न दाखला, आधारकार्ड, मागील वर्षाचे निकालपत्र आदींची तपासणी शासकीय नियमांप्रमाणे करण्याच्या सूचना केल्या. जर यात काही खोटे आढळल्यास तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आशुतोष पाटील, एफ. डब्ल्यू. चव्हाण, आर. डी. बच्छाव आदी उपस्थित होते.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच