धक्कादायक! "आई हरविली माझी"...अन् सापडली चक्क गोणीत..

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

महिलेचा मुलगा सचिन वसंतराव पाटील (वय 34, दुर्गामाता मंदिरासमोर, जेल रोड) यांच्या तक्रारीनुसार, 1 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास सचिन पाटील यांची 62 वर्षांची आई मंदाकिनी पाटील (मेधने) या ब्लाउजपीस घेण्यासाठी नाशिक रोड येथे जाऊन येते, असे सांगून गेल्या त्या पुन्हा आल्याच नाही. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र...

नाशिक : जेल रोड येथील दुर्गामंदिर परिसरात दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 62 वर्षांच्या महिलेचा खून झाल्याची घटना उघड झाली. या महिलेचा मृतदेह खुल्या भूखंडावर पोत्यात ठेवला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

महिलेचा मुलगा सचिन वसंतराव पाटील (वय 34, दुर्गामाता मंदिरासमोर, जेल रोड) यांच्या तक्रारीनुसार, 1 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास सचिन पाटील यांची 62 वर्षांची आई मंदाकिनी पाटील (मेधने) या ब्लाउजपीस घेण्यासाठी नाशिक रोड येथे जाऊन येते, असे सांगून गेल्या त्या पुन्हा आल्याच नाही. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र त्या आढळल्या नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री अकराच्या सुमारास उपनगर पोलिसांत आई हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ताची नोंद करून घेतली. मंगळवारी (ता. 11) सकाळी साडेआठच्या सुमारास पाटील यांच्या घरासमोरील दुर्गामाता मंदिराजवळील धनराजनगरमधील भूखंडातून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सचिन पाटील हे भाऊ संदीपसह तेथे गेले असता, बारदानाची गोणी पडलेली दिसली. त्यातूनच दुर्गंधी येत होती.

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

उपनगर पोलिसांत गुन्हा; दहा दिवसांपासून बेपत्ता 

नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस ही गोणी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्‍टरांनी गोणीचे तोंड उघडले असता, त्यात महिलेचा मृतदेह आढळला. पाटील कुटुंबीयांनी मृतदेहावरील साडी, सोन्याच्या बांगड्या व कर्णफुले पाहून हा मृतदेह मंदाकिनी पाटील यांचाच असल्याचे सांगितले. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing woman dead body found in bag Nashik Crime Marathi News