घंटागाडी कर्मचाऱ्यांना मास्क, हॅण्डग्लोज पुरवा; आमदार फरांदे यांची आयुक्तांकडे मागणी 

विक्रांत मते
Friday, 2 October 2020

शहराच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी कर्मचारी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतं असून हॉटस्पॉटच्या यादीत समाविष्ट झाले आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थिती मध्ये काम करणाया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला जास्त प्राधान्य देण्याची आवशक्यता असून घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी सॅनीटायझर, एन ९५ मास्क, हँन्डग्लोज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली.

शहराच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी कर्मचारी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे ना मास्क आहे, ना सॅनीटायझर, ना हँन्डग्लोज आहे. घंटागाडी ठेकेदार कुठल्याही सुरक्षा उपकरणांचा पुरवठा या कर्मचाऱ्यांना करत नाहीत. घंटागाडी कर्मचारी गरीब असल्यामुळे त्यांना जीवाचा धोका पत्करून काम करावे लागत असुन महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेच्या साहित्याचा पुरवठा होत आहे किंवा नाही याची पाहणी करून साहित्य वाटपाचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे अशी मागणी प्रा. फरांदे यांनी केली.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla demadnd masks, handgloves for garbage collectors nashik marathi news