दुर्दैवी! पै पै करून जमवलेला शेतकऱ्याचा संसार बेचिराख; दोन लाखांची रोकड भस्मसात

mohadi fire.jpg
mohadi fire.jpg

सटाणा ( जि. नाशिक) : काबाडकष्ट करून, घाम गाळून मेहनतीने पै पै करून जमवलेल्या शेतकऱ्याचा संसार जेव्हा त्याच्याच डोळ्यादेखत भस्मसात होत असतो. तेव्हा त्या शेतकऱ्याचे दुख:, त्याच्या वेदनांचा अंदाज कोणालाच येणार नाही. आधीच सततची नापिकी, अस्मानी संकट आणि कर्जबाजारीपणाने कंटाळलेला शेतकरी कुठेतरी उमेद घेऊन जगत असतो. त्यातच नशिबाचे चक्र फिरते आणि दुर्दैवी घटना होऊन बसते. 

कुटुंबीयांसमवेत शेतात काम करताना घडला प्रकार

गजमल तुळशीराम सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात काम करत असताना अचानक घराला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच रोकड जळून खाक झाली. आगीत सुमारे पावणेतीन लाखांचे नुकसान झाले. झापाला लागलेल्या भीषण आगीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथे बुधवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप

दरम्यान, तलाठी नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.बँकेने नोटा नाकारल्या.घराचे बांधकाम करण्यासाठी सूर्यवंशी यांनी दोन लाख रुपये घरात ठेवले होते. मात्र या दुर्घटनेत दोन लाख रुपयांची रोकड अर्धवट जळाली. याबाबत महसूल यंत्रणेने तसा पंचनामादेखील केला आहे. या नोटा बदलण्यासाठी पीडित शेतकरी भारतीय स्टेट बँकेच्या सटाणा शाखेत गेले असता संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात असून, जळालेल्या नोटा तात्काळ बदलून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com