IGP प्रताप दिघावकरांचा दणका! नाशिकच्या १४ शेतकऱ्यांना दहा दिवसांत पैसे; काय घडले वाचा

विनोद बेदरकर
Tuesday, 15 September 2020

अशाच प्रकारचे काम भविष्यात साहेबांकडून मिळेल, अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त केली व महाराष्ट्र पोलिस खात्याचा दणका खऱ्या अर्थाने काय आज अनुभव असल्याने प्रमुख्याने खडक सुकेणे गावातील शेतकरी या घटनेमुळे आनंदित झाला आहे.  

नाशिक : ‘शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या १४ प्रकरणांत एका व्यापाऱ्याने साडेसात लाख रुपये दिले असून, उर्वरित १३ प्रकरणांत संशयित व्यापाऱ्यांनी दहा दिवसात पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. एकूणच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या दणक्यानंतर साधारण आठवडाभरात जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंद

दिंडोरी येथील शेतकऱ्यांनी दिघावकर यांच्या बातमीचे कात्रण व्यापाऱ्यांना दाखविले. व्यापाऱ्याने खळखळ न करता, थकविलेले पैसे शेतकऱ्यांना परत केले. खडके सुकेणे येथे आनंद व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष प्रसिद्ध आहेत. ग्रेप सिटी असलेल्या जिल्ह्यातून कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. आयात-निर्यातीसाठी जगभरातील व्यापारी जिल्ह्यात येतात. त्यात काही व्यावसायिक शेतकऱ्यांचा माल घेऊनही त्यांना पैसे देत नाहीत. तर काही प्रकरणांत व्यापारी शेतीमाल घेऊन जातात, त्यापोटी जे धनादेश देतात, ते वटत नाही.

जिल्ह्यात १४ प्रकरणे उघडकीस

अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलेल्या नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी प्राधान्य दिले आहे. पाचही जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्यांनी त्वरित कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात १४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. 

१४ गुन्हे दाखल 
अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, सिन्नर व नाशिक तालुक्यांतील फसवणुकीच्या तक्रारीचा आढावा घेत फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वणी पोलिस ठाणे चार गुन्हे, पिंपळगाव- दोन, दिंडोरी- चार, लासलगाव- एक, सिन्नर एमआयडीसी-एक, सटाणा- एक व नाशिक तालुका- एक याप्रमाणे जिल्ह्यात १४ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या फसवणूक प्रकरणातील संशयिताशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिंडोरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील व्यापाऱ्याने तीन शेतकऱ्यांना पाच लाख ५० हजार रुपये परत दिले आहेत, तर उर्वरित फसवणूक प्रकरणातील १३ व्यापाऱ्यांनी दहा दिवसांत शेतकऱ्याचे पैसे देण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

दिंडोरीत आनंदोत्सव 
दिंडोरी : खडके सुकेणे (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१४) श्री. दिघावकर यांना भेटून फसवणुकीच्या व्यथा मांडल्या होत्या. नाशिकचे भूमिपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट करीत, प्रथम शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार व त्या बातण्यांची कात्रणे खडकसुकेणे येथील शेतकऱ्यांनी बातमीचे कात्रण एका व्यापाऱ्याला दाखवत वेळेत पैसे मिळाले. खडक सुकेणे येथील बापू तात्या (पालखेड) यांना तीन लाख रुपये आणि सुभाष गणोरे यांना एक लाख १४ हजारांची द्राक्ष व्यापाऱ्याकडे असलेली रक्कम केवळ बातमीच्या दणक्याने संबंधित शेतकऱ्यांना आज मिळाली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

फसवणूक थांबणार 
दिघावकर यांच्या शेतकरी बांधवांना मदत करण्याच्या भूमिकेमुळे ‍या हंगामात शेतकऱ्यांची काहीअंशी का होईना फसवणूक थांबणार असून, बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून पुन्हा जोमाने आपल्या द्राक्ष शेतीवरक पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे. अशाच प्रकारचे काम भविष्यात साहेबांकडून मिळेल, अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त केली व महाराष्ट्र पोलिस खात्याचा दणका खऱ्या अर्थाने काय आज अनुभव असल्याने प्रमुख्याने खडक सुकेणे गावातील शेतकरी या घटनेमुळे आनंदित झाला आहे.  

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money return 14 farmers of Nashik in ten days due to pratap dighavkar nashik marathi news