चिंताजनक.. मालेगावात कोरोनाचा उद्रेक..आकडा सहाशेपार..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

मालेगावात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असल्याने शहरवासीय हादरले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या अशा खळबळजनक बातमीमुळे कसमादे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कसमादेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

नाशिक/ मालेगाव : मालेगावात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असल्याने शहरवासीय हादरले आहेत. मंगळवारी (ता.१९) आलेल्या अहवालात मालेगावात २४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आकडा आता साडेसहाशे पार पोहचला आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ८२४ वर...

मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या १९० संशयितांच्या अहवालांपैकी १६६ निगेटिव्ह तर २४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बाधितांमध्ये श्रीरामनगर, द्याने रिक्षा स्टँड, पिंपळे शिवार, सावता नगर, आंबेडकर नगर, महात्मा फुले मार्केट, सरसैय्यद नगर, सुमेर नगर, हिंगलाय नगर आदी भागातील ०३ आणि ०४ वर्षे वयाच्या बालकांसह इतर व्यक्तींचा समावेश...
.
▪️नाशिक जिल्हा : ८२४...
▪️मालेगाव रुग्ण संख्या : ६५२..
.

कसमादे भागात भितीचे वातावरण

मालेगावात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असल्याने शहरवासीय हादरले आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या अशा खळबळजनक बातमीमुळे कसमादे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कसमादेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

मालेगावातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब
मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ज्यामुळे शहरात चिंतेचे वातवरण आहे.

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 24 corona positive found in Malegaon nashik marathi news