esakal | ती एक काळरात्र! पोल्ट्रीतील भयानक दृश्य पाहून शेतकऱ्यालाही धक्का; नागरिकांत भीती
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (61).jpg

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किशोर देसले यांनी गावानजीक असलेल्या शेतात दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री उभारला आहे. पण एका मध्यरात्रीने सारं काही उध्वस्थ केले. त्या रात्री घडलेल्या घटनेने शेतकऱ्यालाही चांगलाच धक्का बसला.  सोबतच गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालंय. काय घडले नेमके?

ती एक काळरात्र! पोल्ट्रीतील भयानक दृश्य पाहून शेतकऱ्यालाही धक्का; नागरिकांत भीती

sakal_logo
By
दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किशोर देसले यांनी गावानजीक असलेल्या शेतात दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री उभारला आहे. पण एका मध्यरात्रीने सारं काही उध्वस्थ केले. त्या रात्री घडलेल्या घटनेने शेतकऱ्यालाही चांगलाच धक्का बसला.  सोबतच गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालंय. काय घडले नेमके?

ती एक काळरात्र! पोल्ट्रीतील भयानक दृश्य पाहून शेतकऱ्यालाही धक्का

युवा शेतकरी किशोर देसले यांनी गावानजीक असलेल्या शेतात दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री उभारला आहे. तयार झालेल्या कोंबड्या दोन दिवसांत संबंधित कंपनी नेणार तोच रात्री दहाच्या सुमारास पोल्ट्रीजवळ दोन बिबट फिरतांना आढळून आले. कोंबड्यांच्या आवाजामुळे किशोरने टॉर्चने प्रकाश फिरवल्यावर हे बिबट आढळून आल्याचे सांगितले. रात्री दोन वेळा ट्रॅक्टर व टॉर्चच्या प्रकाश व आवाजामुळे बिबट्यांना हुसकावून लावण्यात यश आले. मात्र पुन्हा रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला आणि कोंबड्या बिथरल्या.. बहुतांश फस्त केल्या तर काही कोंबड्या बिबट्याच्या पायााखाली चिरडल्याचे निदर्शनास आले होते. सकाळी बिबट्याची बातमी पंचक्रोशीत वा-यासारखी पसरताच बघ्याची गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्ते विलास देसले यांनी सटाणा वनविभागातील वनपरिक्षेत्र आधिकारी वैभव हिरे यांना माहिती दिली. वनकर्मचारी स्वाती सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

बिबट्याच्या हल्ल्यात पन्नासहून अधिक कोंबड्या दगावल्या

बागलाण तालुक्यातील गोराणे येथील गावानजीक असलेले युवा शेतकरी किशोर देसले यांच्या शेतातील पोल्ट्रीत बिबट्या लोखंडी जाळी उचकटून शिरल्याने पन्नासहून अधिक कोंबड्या दगावल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सटाणा वनविभागातील कर्मचाऱ्यांकडून सकाळी मृत कोंबड्यांचा पंचनामा करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय