Coronavirus : 'स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही कोरोना विषाणू'?

infection virus on mobile.jpg
infection virus on mobile.jpg

नाशिक : सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन हजारांहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. कोरोनाचे विषाणू दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या मोबाईलपासून तर उघड्यावरील पदार्थांपर्यंत, तसेच सार्वजनिक ठिकाणीही फैलावत आहे. 

मोबाईल स्क्रीनवर आठ ते दहा तास जिवंत

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याचे विषाणू हात व मोबाईल स्क्रीनवर आठ ते दहा तास जिवंत राहू शकतात. स्मार्टफोनचा वापर केल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवावा. स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही कोरोना विषाणू आढळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर बरेच तास कोरोना विषाणू जिवंत राहू शकतात. स्मार्टफोन वापरून झाल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. स्मार्टफोनची स्क्रीन अल्कोहोल वाइप्सने पुसल्यास धोका टळू शकतो. 

तापमान जास्त असेल, तर व्हायरसचा प्रसार आणि प्रभावावर रोख

कोरोनाच्या व्हायरसपासून मोबाईलला जपावं लागणार आहे. हा व्हायरस सर्वांत जास्त वेळ मोबाईल स्क्रीनवर जिवंत राहू शकतो. कोरोना संक्रमित एखाद्या व्यक्तीने मोबाईलला हात लावल्यास मोबाईल फोनवर हा व्हायरस आठ ते दहा तास जिंवत राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलला सुरक्षित ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. एखाद्या कपड्यावर हा वायरस नऊ तासांपर्यंत जिवंत राहू शकणार आहे. दरम्यान जर कपड्यांना दोन तास उन्हात सुखवल्यास हा व्हायरस मरतो. तापमान जास्त असेल, तर व्हायरसचा प्रसार आणि प्रभाव रोखू शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत अशा विषाणूंचा फैलाव अधिक होतो. 

कोरोना व्हायरसच्या भीतीने घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी. अजूनपर्यंत शहरात कोरोना व्हायरसची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सजग रहावे व गर्दीत जाणे टाळावे. - सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com