"माझ्या लेकाचा मृत्यू न्यूमोनिया वा व्यसनामुळे नाही झाला..तर...";मातेचा घातपाताचा संशय..नेमका प्रकार काय?

ankit mahankar 1.jpg
ankit mahankar 1.jpg

नाशिक : अंकित महानकर याचा मृत्यू न्यूमोनिया वा व्यसनामुळे झालेला नसून त्याच्याच सहकाऱ्यांनी मारले. पोलिस मात्र तपासातील तथ्यांपासून आम्हाला दूर ठेवत असल्याचा गंभीर आरोप मृत अंकितच्या कुटुंबाने केला आहे. नेमका प्रकार काय?

मातेचा घातपाताचा संशय
अंकित शिक्षणासाठी संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये होता, तर गुलमोहर कॉलनी, कामगारनगर येथे भाडेतत्त्वावर तीन सहकारी मित्रांसोबत राहत होता. १४ मार्चला अत्यवस्थ झालेल्या अंकितला त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांसह संबंधित मुलांनी अंकितचा व्यसनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र अंकितला व्यसन नसल्याचे महानकर यांचे म्हणणे आहे. या तपासात पुरावे नष्ट केले गेले पण पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप महानकर यांनी केला. घटनेच्या रात्रीपर्यंत आम्ही त्याच्या संपर्कात होतो. त्याला कोणताही त्रास होत असल्याचे सांगितले नाही.

चौकशीसाठी पोलिसांना साकडे 

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आम्हाला मार्च महिन्यानंतर पाठपुरावा करता आला नाही. आम्ही ई-तक्रार दिली. मात्र, तीसुद्धा पोलिसांनी दाखल करून घेतली नाही. अंकितला विष देऊन मारण्यात आल्याचा दावा करीत महानकर कुटुंबाने चौकशीची मागणी केली. मृत अंकितची आई प्रमिला दिनकर महानकर (रा. मोठी उमरी, अकोला) यांनी नाशिकला पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. 

फॉरेन्सिक अहवालात अंकितच्या पोटात विष नसल्याचे समोर आले आहे. त्याचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. सकृतदर्शनी हत्या असल्याचे पुरावे समोर नाहीत. -विजय खरात, पोलिस उपायुक्त  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com