VIDEO : छत्रपती संभाजीराजे म्हणाले…''मी अशोक चव्हाणांच्या हाकालपट्टीच्या विरोधात!''

विनोद बेदरकर
Sunday, 3 January 2021

माजी मुख्यमंत्री व सध्या मराठा आरक्षण अभ्यास समितीचे प्रमुख असलेले अशोक चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी केली म्हणजे मार्ग निघेल असे नाही. त्यामुळे मी हकालपट्टीच्या विरोधात आहे. त्यांच्या अनुभवाचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपयोग व्हावा, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

नाशिक : माजी मुख्यमंत्री व सध्या मराठा आरक्षण अभ्यास समितीचे प्रमुख असलेले अशोक चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी केली म्हणजे मार्ग निघेल असे नाही. त्यामुळे मी हकालपट्टीच्या विरोधात आहे. त्यांच्या अनुभवाचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपयोग व्हावा, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. खासदार संभाजीराजे रविवारी (ता. 3) नाशिकला आले होते. 

 

छत्रपती संभाजीराजे म्हणाले... 

मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्य़ा मागास आहे हे सिद्ध झालेले आहे. समाजानेही ते सिद्ध केल आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात "ईव्हीएस' कोट्यातील आरक्षण घेतल्यास मराठा समाजाला कोणताही धोका होणार नाही हे राज्य सरकारने सांगावे, "ईव्हीएस' गटातील आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे. ते आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नाही. त्यामुळे याबाबत समाजात या आरक्षणावरुन शंका देखील आहेत. त्यामुळे समाजांत विश्‍वास निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने स्पष्टीकरण व विश्‍वास दिला पाहिजे. 

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

मीच भेटीची वाट पहातोय 

सध्याच्या वातावरणात इतर मागास वर्गातील समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरं आहे. मात्र "ओबीसी"च्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आरक्षण द्या, हे मराठा समाजाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय. मात्र त्यांची अजून वेळ मिळालेली नाही. 

नाशिकच्या गड किल्यांचा विकास

शिवस्मारक झाला तर त्याचा आनंदच आहे. मात्र शिवस्मारकाची जागा का बदलली? हा मला देखील प्रश्न पडला आहे. असे सांगत त्यांनी नाशिकच्या गड किल्ले विकासासाठी सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे असे आवाहान केले. ते म्हणाले राज्यात सर्वात जास्त किल्ले नाशिकला आहेत. मात्र ते देखील अजून दुर्लक्षित आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे. नाशिकला सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. 

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

संभाजीनगर नामकरणास समर्थन 

ते म्हणाले, औरंगाबाद शहराचे नामांतर सध्या चर्चेत आले आहे. या शहराचे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. या नामकरणाला माझे पूर्ण समर्थन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Chhatrapati Sambhaji Raje said that he was against the removal from the post of Ashok Chavan