आता तर महावितरणने कळसच गाठला! वीज कनेक्शनचा पत्ता नाही..शेतकऱ्याला बिल पाठवले लाखाचे.. वाचा काय घडले

खंडू मोरे
Tuesday, 4 August 2020

लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल दिले जात असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच येथील एका शेतकऱ्यास शेतात वीज कनेक्शन नसतानाही तब्बल लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. अत्यंत संतापजनक प्रकार इथल्या शेतकऱ्यासोबत घडला आहे.

नाशिक / खामखेडा : लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल दिले जात असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच येथील एका शेतकऱ्यास शेतात वीज कनेक्शन नसतानाही तब्बल लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. अत्यंत संतापजनक प्रकार इथल्या शेतकऱ्यासोबत घडला आहे. वाचा नेमके काय घडले?

शेतकऱ्यास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनस्ताप 
लॉकडाउनच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल दिले जात असल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच येथील एका शेतकऱ्यास शेतात वीज कनेक्शन नसतानाही तब्बल लाखभर रुपयांचे वीजबिल पाठविण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. त्यातून महावितरणच्या कामकाजातील गोंधळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे,   कोटेशन भरून नऊ वर्षे झाली, तरीही महावितरणने वीज कनेक्शन दिले नाही अन्‌ संबंधित अर्जदार शेतकऱ्याला चक्क ९८ हजार ४५० रुपयांचे बिल पाठविले आहे. खामखेडा येथील भाऊसाहेब तानाजी अहिरराव यांनी १२ मार्च २०११ ला वीजपंपासाठी चार हजार ८१० रुपयांचे कोटेशन महावितरणच्या ठेंगोडा केंद्राकडे दाखल केले. शेतात वीज येईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, नऊ वर्षे उलटूनही ना शेतात विजेचे खांब आले ना विजेची तार. आले ते फक्त विजेचे लाखभर रुपयांचे बिल! त्यामुळे विजेचा लाभ तर दूरच उलट चांगलाच मनस्ताप झाला आहे. या नऊ वर्षांत त्यांनी वीज कनेक्शनसाठी महावितरणचे उंबरठे झिजविले. अखेर कंटाळून कनेक्शनची आशा सोडून दिली. असे असताना महावितरणने मात्र भोंगळ कारभाराचा कळस गाठत त्यांना विहिरीवरील वीज वापराचे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ९८ हजार ४५० रुपये बिल पाठविले आहे. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना
  
मी अल्पभूधारक शेतकरी असून, नऊ वर्षांपूर्वी शेतात विहिरीसाठी वीज कनेक्शन मिळावे, यासाठी अर्ज  केला होता. मात्र, अद्यापही माझ्या शेतात कनेक्शन देण्यात आले नाही. आता मात्र महावितरण कंपनीने लाखभर रुपयांचे वीजबिल पाठवून नसता मनस्ताप दिला आहे.  -भाऊसाहेब अहिरराव, शेतकरी, खामखेडा 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतून संबंधित शेतकऱ्यास ऑगस्ट २०१२ मध्ये वीजजोडणी दिली. तेव्हापासून वीजवापराचे बिल दिले जात आहे. संबंधित शेतकऱ्याचा संबंधित कनेक्शनवर वापर नसल्याची  चौकशी करून त्यांची तक्रार व मागणी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल.  -राजेश हेकडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, देवळा  

 

रिपोर्ट - खंडू मोरे

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL send electricity bills of lakhs of rupees to farmers nashik marathi news