#21daylockdown : सोशल डिस्टन्सचा उद्देश फेल होताच महापालिकेने शोधली चांगलीच शक्कल! पाहा PHOTOS

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 मार्च 2020

देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. परंतु त्यातूनही गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सचा उद्देश सफल होत नसल्याने महापालिकेने एक चांगलीच शक्कल लढविली असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक : कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. परंतु त्यातूनही गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सचा उद्देश सफल होत नसल्याने महापालिकेने एक चांगलीच शक्कल लढविली असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. रविवार कारंजा, अशोक स्तंभ, मेन रोड अशा गर्दीच्या ठिकाणी लोक जात असतील तर तेथे ठराविक अंतराने साधारण एक मीटर अंतरावर शिक्के मारण्यात आले आहेत तसेच त्या जागेवरूनच नागरिकांनी वस्तू खरेदी करायची व दुकानदाराने बसल्या जागेवरूनच ठराविक अंतर ठेवून ती वस्तू ग्राहकाला द्यायची आहे. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी किमान या नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

Image may contain: 1 person, standing and outdoor

 

Image may contain: shoes and outdoor

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

Image may contain: one or more people and outdoor

 

Image may contain: one or more people and outdoor

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation created idea to The purpose of Social Distance is to fail nashik marathi news