esakal | महापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क; पुन्हा वाढले प्रलंबित अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

corona test 1234.jpg

काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रलंबित अहवालांची संख्या नियंत्रणात आली होती; परंतु पुन्हा एकदा प्रलंबित अहवालांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. 

महापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क; पुन्हा वाढले प्रलंबित अहवाल

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रलंबित अहवालांची संख्या नियंत्रणात आली होती; परंतु पुन्हा एकदा प्रलंबित अहवालांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २३५ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी नाशिक शहरातील ६०१, नाशिक ग्रामीणचे ५४२, तर मालेगाव येथील ९२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे.

महापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ४८१ कोरोनाबाधित आढळले असून, उपचार घेत असलेल्या ५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर या तीन दिवसांत जिल्ह्यात ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातून ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या १०७ ने घटली असून, सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ४९७ बाधित उपचार घेत आहेत.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

महापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका यंत्रणा सतर्क
गेल्या सोमवारी (ता. १६) नाशिक शहरात ७४, नाशिक ग्रामीणमध्ये ३०, मालेगावला एक, तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मंगळवारी (ता. १७) नाशिक शहरातील १२५, नाशिक ग्रामीणचे ३०, मालेगावचे सहा, जिल्ह्याबाहेरील पाच पॉझिटिव्ह आढळले, तर बुधवारी (ता. १८) नाशिक शहरातील १४०, नाशिक ग्रामीणमध्ये ५०, मालेगावमध्ये १६, तर जिल्हाबाह्य दोन बाधित आढळून आले. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात एकूण ४८१ कोरोनाबाधित आढळले. गेल्या तीन दिवसांत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ४३८, नाशिक ग्रामीणमधील ७०, मालेगावचे ६० आणि जिल्ह्याबाहेरील नऊ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, या तीन दिवसांत एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, यात नाशिक शहरातील दोन, नाशिक ग्रामीणमधील सात, मालेगाव एक, तर जिल्ह्याबाहेरील धुळे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

जिल्ह्यात तीन दिवसांत अकरा जणांचा मृत्यू 
यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९७ हजार ५१९ झाली असून, यांपैकी ९३ हजार ३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ७४१ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ७१०, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ५५, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात सात, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२, जिल्हा रुग्णालयात चार रुग्ण दाखल झाले आहेत.