लग्नाच्या वरातीतला थरार! डीजेच्या तालावर थिरकणारी पावलं वळली खुनाकडे; घटनेचा उलगडा

Sakal - 2021-03-05T094006.526.jpg
Sakal - 2021-03-05T094006.526.jpg

सुरगाणा (जि.नाशिक) : रोटी येथे वरातीत डीजेच्या तालावर ठेका धरलेला असताना एका किरकोळ कारणावरून युवकांची पाऊले आपोआप गुन्हेगारीकडे वळल्याचा प्रकार समोर आला आहे, काय घडले नेमके?

डीजेच्या तालावर थिरकणारी पावलं वळली खुनाकडे 

२८ फेब्रुवारीला मधुकर ऊर्फ चम्या राऊळ (वय २५) व त्याचा मेहुणा दोघे रोटी येथे वरातीत नाचण्यासाठी गेले होते. या वेळी वरातीत नाचण्यावरून त्यांचा राजू ऊर्फ राजेंद्र बागूल (रा. वांजूळपाडा) याच्याशी वाद झाला होता. तो मोटारसायकलवर राजेंद्रला बसवून गाळपाडा येथे दारू पिण्यासाठी बहाणा करून घेऊन गेला. गाळपाडा येथून परत येताना हरणटेकडी शिवारात रोटी फाटा येथे त्याने त्यास दगडाने ठेचून नालीत टाकले आणि डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची कबुली त्याने दिली. दोन दिवसांत या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, एएसआय मुंढे, महाले, यांसह सुरगाणा येथील पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, सागर नांद्रे, आदींनी केलेल्या तपासात यश मिळाले. या प्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, तपास सुरू आहे. 

व्हिडिओवरून संशयिताचा माग 
घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मृत राजेंद्र बागूल व संशयित डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ एकाच्या मोबाईलमध्ये पोलिस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसला. त्यावरून संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले. 

मुख्य संशयितास पकडण्यात यश

घाटमाथ्यावरील तरुणाच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखा व सुरगाणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मुख्य संशयितास पकडण्यात यश मिळाले आहे. रोटी फाट्याजवळ १ मार्चला वांजूळपाडा येथील तरुण राजेंद्र बागूल याचा मृतदेह आढळला होता. रोटी येथे वरातीत डीजेच्या तालावर ठेका धरलेला असताना किरकोळ धक्का लागल्याने नाचण्याच्या किरकोळ कारणावरून हत्येचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चम्या सापडला...
पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, ग्रामीण अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पोलिस तपास सुरू असताना सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर ऊर्फ चम्या राऊळ (वय २५) याचे नाव समोर आले. शोध सुरू असताना मधुकर सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे सापडला. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सारा प्रकार सांगितला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com