VIDEO : नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये सेनेतील "हा" जवान विजेता

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 5 January 2020

वातावरणातील गारव्यात प्रचंड उत्साहात धावतांना विविध पंधरा गटांतून धावपटूंनी सहभाग नोंदविला. हवेत गारवा असतांना धावपटूंमध्ये ऊर्जा संचरली होती. यंदाच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत अनेकजण सहभागी झाले होते.

नाशिक : वातावरणातील गारव्यात प्रचंड उत्साहात धावतांना विविध पंधरा गटांतून धावपटूंनी सहभाग नोंदविला. हवेत गारवा असतांना धावपटूंमध्ये ऊर्जा संचरली होती. यंदाच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत राजस्थान येथील व सध्या देवाळली कॅम्प येथे नियुक्‍त असलेला सेनादलातील जवान सुनील कुमार याने मॅरेथॉन स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.

 

Image may contain: 17 people, people smiling, crowd

गारव्यात धावपटूंमध्ये संचारली ऊर्जा, विविध पंधरा गटांमध्ये धावपटूंचा सहभाग

सकाळी पावणे सहाला 42 किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. ऑलिंम्पिकपटू अजित लाकरा यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात झाली. यानंतर विविध पंधरा गटातील धावपटूंच्या शर्यतीला सुरवात झाली. मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रेमींनीही गर्दी केली होती. स्पर्धेत 42.195 किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन गटात सेनादलाचे वर्चस्व राहिले. या गटातून मुळचा राजस्थान येथील व सध्या देवळाली कॅम्प येथे नियुक्‍त असलेला जवान सुनील कुमार याने प्रथम क्रमांकासह एक लाख रूपयांचे पारितोषिक पटाकवले. 2 तास 28.25 मिनीटे अशी वेळ नोंदवितांना त्याने ही कामगिरी केली. तर दुसऱ्या क्रमांकावर मुळचा नागपूरचा व सैन्यातील जवान देवेंद्र चिखलोंढे याने 75 हजारांचे द्वितीय पारितोषिक पटकावले. त्याने स्पर्धेत 2 तास 30.06 मिनीटे अशी वेळ नोंदविली. तर तिसऱ्या स्थानी अंकुर कुमार (उत्तर प्रदेश) हा जवान राहिला. त्याने 2 तास 30.52 मिनीटांत स्पर्धा पूर्ण केली. 21.097 किलोमीटर अंतराच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत गुरूजीत सिंग याने 1 तास 09.12 मिनीटे अशी वेळ नोंदविली.

 

Image may contain: 5 people, people standing, crowd and outdoor

ऐंशी वर्षाच्या धावपटूंनी वेधले सर्वांचे लक्ष
स्पर्धेत विविध वयोगटातील धावपटूंसह उपस्थितांचे लक्ष वेधले ते ऐंशी वर्षापुढील वयोगटातील धावपटूंनी. तब्बल दहा किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत सहभागी होतांना 82 वर्षीय बाळकृष्ण अलई यांनी 1 तास 15 मिनीटांत ही स्पर्धा पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. तर नारायण वाळवेकर यांनी द्वितीय, रामचंद्र बधाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

Image may contain: 6 people, people standing, crowd and outdoor

स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभास ऑलिंम्पिकपटू अजित लाकरा, पोलिस आयुक्‍त विश्वास नांगरे-पाटील, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस व आयोजन समिती अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, चिटणीस डॉ.सुनील ढिगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Image may contain: 9 people, people smiling, people standing, flower and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MVP Marathon Nashik Marathi News