"ट्रम्प साहेब...जेवणात आमचा कांदा अगोदर खा..अन् तोच अमेरिकेत पाठवा  " पत्रातून शेतकऱ्यांच्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

भारत हा कृषी प्रधान असून येथे शेतकऱ्यांचे सर्वाधिक शोषण होत आहे. शेतीला हमी भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग लागू होत नाही, खते ,बियाणे यांच्या किंमती कमी होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत चालला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी भारत सरकारला मार्गदर्शन करावे असे आवाहन साठे यांनी केले आहे.

नाशिक : महाराष्ट्राचा कांदा आरोग्यास कसा चांगला आहे याचे स्पष्टीकरण तसेच आपणही अमेरिकेत कांदा निर्यात करावा. असे आवाहन निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी दाम्पत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया ट्रॅम्प यांना केले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि मेलनियासाठी शेतकऱ्याने गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे पाठवून शेतक-यांच्या व्यथा पत्रातून मांडून अमेरिकेत कांदा निर्यात करावी अशीही विनंती केली आहे. तसेच भारतातील शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावेल, कर्जातून कसा मुक्त होईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगावे अशी विनंती देखील शेतकऱ्याने केली आहे.

ट्रम्प दांपत्य भारताच्या दौऱ्यावर..पत्रातून मांडल्या व्यथा...
ट्रम्प दांपत्य (ता. २४ व २५) फेब्रुवारी असे  दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या जेवनाच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहे.  साठे हे एक सामान्य शेतकरी असून अवघी दोन एकर शेती ते करतात. शेतात कांदा पिकाची लागवड दरवर्षी करत असतात. यंदा देखील कांद्याची लागवड केली आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटले उत्पादन कमी झाल्याने कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती.

No photo description available.

मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्यावर निर्यात बंदी केली. इतर देशांना सर्वाधिक महाराष्ट्राचा कांदा पसंत असूनही कांद्या निर्यात होत नाही. त्यामुळे भाव कोसळले आणि शेतकऱ्याचा कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने साठे हवालदिल झाले. 

Image may contain: 2 people, people sitting

फास्ट पोस्टने कांदे आणि पत्र ट्रम्पना रवाना
अमेरिकेच्या जनतेला कांदा खाण्यास योग्य आहे तो अगोदर तुम्ही खाऊन पहा आणि नंतर तोच कांदा अमेरिकेत पाठवा अशी विनंती मोदी यांना करून निर्यात बंदी उठवण्याचे आव्हान करा असे पत्र लिहून पाठवले आहे. भारत हा कृषी प्रधान असून येथे शेतकऱ्यांचे सर्वाधिक शोषण होत आहे. शेतीला हमी भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग लागू होत नाही, खते ,बियाणे यांच्या किंमती कमी होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत चालला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी भारत सरकारला मार्गदर्शन करावे असे आवाहन साठे यांनी केले आहे. साठे यांनी नुकतीच फास्ट पोस्टने कांदे आणि पत्र पाठवले आहे. त्यांच्या या संकल्पनेची केंद्र सरकार आणि अमेरिका सरकार कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

Image may contain: food

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naitale,s Farmers sent letter to America,s President Donald Trump Nashik Marathi News