PHOTOS : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याला "रामसर'चा दर्जा! राज्यातील हे पहिले ठिकाण!

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 26 January 2020

265 पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट येथे ऐकण्यास मिळतो. पाणथळाचे रामसर करण्याकडे वन विभागासह सरकारच्या प्रयत्नाला यश आले असून, रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये आढळून येतात. दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होते. गेल्या दहा वर्षांपासून नांदूरमध्यमेश्‍वरला रामरसचा दर्जा मिळण्यासाठी नाशिक वन विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्‍वर वन्यजीव अभयारण्याला "रामसर'चा दर्जा प्राप्त झाला असून, राज्यातील हे पहिले ठिकाण ठरले आहे. स्वित्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने त्या संदर्भातील प्रस्ताव पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

महाराष्ट्रातील पहिले ठिकाण; पाणथळचे होणार संरक्षण,

265 पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट येथे ऐकण्यास मिळतो. पाणथळाचे रामसर करण्याकडे वन विभागासह सरकारच्या प्रयत्नाला यश आले असून, रामसरमध्ये आढळणाऱ्या 148 स्थलांतरित पक्ष्यांपैकी 88 प्रजाती नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये आढळून येतात. दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होते. गेल्या दहा वर्षांपासून नांदूरमध्यमेश्‍वरला रामरसचा दर्जा मिळण्यासाठी नाशिक वन विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या संदर्भात सांगण्यात आलेल्या त्रुटींमध्ये वेळोवेळी सुधारणादेखील करण्यात आल्या. रामसरमुळे आता पक्षी अभयारण्याचे कायापालट होणार असून, पक्षी आणि पाणथळ संरक्षणदेखील होणार आहे. तसेच देशभरातील पर्यटक या ठिकाणी एमार असून, आजूबाजूंच्या गावाला रोजगारदेखील मिळणार आहे 

Image may contain: sky, plant, tree, outdoor and nature
काय आहे रामसर? 
इराणमधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 मध्ये जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरविण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव 1975 पासून अंमलात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे 90 टक्के देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारतानेसुद्धा हा करार स्वीकारला आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्‍वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे. पाणथळ जागा अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था असतात. त्यांच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. पण पाणथळ जागांचा दर्जा सातत्याने घसरत आहे आणि त्यांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे. पाणथळ जागांची विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, खारफुटी वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इत्यादींचा, तसेच मत्स्यसंवर्धनासाठीची तळी, भातशेती, पाणी साठे आणि मिठागरे या मानवनिर्मित ठिकाणांचा सुद्धा समावेश होतो. 
सध्या जगात दोन हजार 200 पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात. एखाद्या देशाने एखाद्या स्थळाला रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यावर त्या देशाला या जागेच्या संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलावी लागतात. 

Image may contain: 11 people, people smiling, people standing, suit, tree, outdoor and nature

"कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत

भारतातील रामसर समाविस्ट काही स्थळे 
- जम्मू आणि काश्‍मीर 
- त्रिपुरामधील रुद्‌सागर तलाव 
- राजस्थानमधील सांभार तलाव 
- मणिपूरमधील लोकटक तलाव 
- पंजाबमधील हरिके तलाव 
- ओरिसामधील चिलका सरोवर 
- केरळमधील वेंबनाद कोल 
- गुजरातमधील नलसरोवर पक्षी अभयारण्य 
- हिमाचलमधील रेणुका अभयारण्य 
- राजस्थानमधील भरतपूर 
- मध्य प्रदेशमधील भोज पाणथळ 

Image may contain: sky, bird, tree, outdoor, nature and water

VIDEO : "माझा फोन टॅप केला असेल तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो" - संजय राऊत

दहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश 
नाशिकमधील नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याचा समावेश रामसरमध्ये झाला असून, दोन दिवसांत दिल्ली येथून नोटिफिकेशन आल्यावर कामास सुरवात होईल, तसेच 1 फेब्रुवारीला पक्षीसंवर्धन समितीची मीटिंगदेखील आम्ही बोलावणार आहोत. - अनिल अंजनकर, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NandurMadhyameshwar Sanctuary is now in Ramsar list Nashik Marathi News