एसपीआय परीक्षेसाठी आता नाशिकलाही केंद्र; उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सोय

Nashik is also the center for SPI examination marathi news
Nashik is also the center for SPI examination marathi news

नाशिक : औरंगाबादस्थित सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अर्थात एसपीआय या संस्थेने २०२१ पासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता राज्‍यात चारऐवजी आठ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. 

गेल्या वर्षीपर्यंत राज्‍यात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात होती. यंदापासून नाशिक, अमरावती, लातूर आणि मुंबई या चार परीक्षा केंद्रांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबारच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आदल्यादिवशी औरंगाबादला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्येच परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले आहे. 

दहावीच्‍या विद्यार्थ्यांना संधी

एसपीआय, औरंगाबाद ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून, येथे राज्यातील तरुणांची नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसाठी तयारी करून घेतली जाते. येथे अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्‍या अभ्यासाबरोबरच एनडीएसाठीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीचीही तयारी करून घेतली जाते. आजपर्यंत या संस्थेने देशाला अनेक सैन्य अधिकारी दिले आहेत. 


परीक्षेसाठी २७ जानेवारीपर्यंत मुदत 

यंदा दहावीत प्रविष्ट असलेल्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठीची परीक्षा १४ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत आहे. येथे अर्ज करण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेले दहावीमध्ये शिकत असलेले पुरुष उमेदवार पात्र आहेत. अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.spiaurangabad.com या संकेतस्थळाला भेट देता येईल. 

एसपीआय औरंगाबाद या संस्‍थेत प्रवेशासाठी प्रयत्‍न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून दर वर्षी वाढते आहे. नाशिकला परीक्षा केंद्र झाल्‍याने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत आणखी वाढ होईल. एसपीआय संस्‍थेमार्फत लष्करालाही चांगले अधिकारी मिळू शकतील. उपलब्‍ध संधीचा उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 
-हर्शल आहेरराव, संस्‍थापक, सुदर्शन ॲकॅडमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com