PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जर्मन एम्बेसी यांनी भारताचा सामाजिक भौगोलिक व सांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी जर्मनी येथील पीटर व त्यांची पत्नी यांना भारतात गेल्या एक वर्षापासून पाठवले आहे. भारतातील विविध राज्य पीटर व त्यांच्या पत्नीने पादाक्रांत केले. मात्र अचानक कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे पीटर यांनी जर्मन प्रशासनाला यासंदर्भात कळवले. यानंतर..

नाशिक रोड : जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे अशाच पार्श्वभूमीवर उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूल जवळ असणाऱ्या मातोश्री नगर येथे सकाळी दोन जर्मन नागरिक(स्त्री व पुरुष) दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन यंत्रणा व उपनगर पोलिसांना कळल्यानंतर या सर्व प्रकरणाची उकल झाली.

Image may contain: one or more people

असा घडला सर्व प्रकार...

जर्मन एम्बेसी यांनी भारताचा सामाजिक भौगोलिक व सांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी जर्मनी येथील पीटर व त्यांची पत्नी यांना भारतात गेल्या एक वर्षापासून पाठवले आहे. भारतातील विविध राज्य पीटर व त्यांच्या पत्नीने पादाक्रांत केले. मात्र अचानक कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे पीटर यांनी जर्मन प्रशासनाला यासंदर्भात कळवले. जर्मन प्रशासनाने पीटर व त्यांच्या पत्नीसाठी मुंबईवरून जर्मनीला येण्याची सोय केली. यातच मध्य प्रदेशातल्या इंदूर येथे अडकलेल्या पीटर यांनी नाशिक रोड उपनगर येथील जॉन्सन यांना संपर्क साधला. जॉन्सन व पीटर यांची पूर्वीपासूनच मैत्री होती. जॉन्सन यांनी पीटर यांना नाशिकमार्गे या असे सांगितले.

Image may contain: 1 person, standing

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गाडीतच झोपणे पसंत केले

यावेळी पीटर हे काल (ता.२५) रात्रीच उपनगर येथील मातोश्री नगर मध्ये आले होते. यावेळी पीटर व त्यांची पत्नी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गाडीतच झोपणे पसंत केले. सकाळी (ता.२६) रहिवाश्यांनी पाहिल्यावर एकच खळबळ उडाली. स्थानिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांना याठिकाणी पाचारण करण्यात आलेत. यावेळी नाशिक महानगरपालिका आणि उपनगर पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. जर्मन नागरिक असलेल्या पीटर याची चौकशी केली असता पीटर यांना जर्मन प्रशासनाने भारतात भौगोलिक परिस्थितीचा सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी पाठवले असल्याचा निर्वाळा त्यांची कागदपत्रे पाहून प्रशासनाला आला.

Image may contain: plant, tree and outdoor

त्यांना जर्मन एम्बासी ने पत्र दिले होते त्यांची कोरोणा चाचणीही करण्यात आली होती. इंदोरवरून नाशिकला येताना रात्री आडगाव पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासणी करून सोडले होते. यावेळी उपनगर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जर्मन प्रशासनाशी यासंदर्भात बातचीत करण्यात आली. यावेळी जर्मन प्रशासनाने उपनगर पोलिसांना सबंध माहिती देऊन कागदपत्रांची माहिती दिली.

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

Image may contain: 1 person, car and outdoor

अन् जर्मन नागरिकांना मुंबईला मार्गस्थ.. 

उपनगर पोलिसांना खात्री पटल्यावर या जर्मन नागरिकांना मुंबईला मार्गस्थ करण्यात आले. यावेळी त्यांची जर्मन प्रकारची गाडी व त्यामागे एक ट्रॉली होती. यामध्ये किचन सह टॉयलेटची ही व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. हे नागरिक कोणाच्याही घरी वास्तव्याला थांबले नाही त्यामुळे घाबरलेल्या लोकांच्या मनातली भीती ही अतिशय कमी झाली. हे नागरिक या ठिकाणाहून गेल्याने इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. उपनगर पोलिसांनी त्यांना मुंबई रस्त्याला मार्गस्थ केले.

Image may contain: one or more people and people standing

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik citizens are horrified to see foreigners Nashik Marathi News