नाशिक जिल्ह्यात ४,२२९ ग्रामपंचायतींचे १२ लाख मतदार ठरविणार कारभारी! 

election symbole.jpg
election symbole.jpg

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६६ ग्रामपंचायतींतील चार हजार २२९ सदस्य निवडीसाठी ११ हजार ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १२ लाख ८४ हजार मतदार गावाचे कारभारी निवडणार आहेत. जिल्ह्यातील १५२ केंद्रांवर शुक्रवारी (ता. १५) मतदान होत आहे.

तयारी पूर्णत्वास, संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त ​

निवडणुकीसाठी नऊ हजार ७६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित जाहीर झाल्या असून, ५५ ग्रामपंचायतींत एक हजार ६२२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात चार हजार २२९ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात निवडणुकीची तयारी सुरू आहे.

अतिसंवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त

जिल्ह्यात एकूण पाच हजार ८९५ पैकी एक हजार ६२२ उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे चार हजार २२९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने ६१ बस, ४०२ जीप आणि १२६ मिनी बस अधिग्रहीत केल्या आहेत. जिल्ह्यात ४४ संवेदनशील, तर आठ अतिसंवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com