चिंताजनक! चारच दिवसांत रेकॉर्डब्रेक नवे रुग्ण...जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांवर...

corona test 1_1.jpg
corona test 1_1.jpg

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही आता वाढला आहे. पाच दिवसांत पाच हजारांहून सहा हजार रुग्णसंख्या झाली होती. आता सहा हजारांवरून सात हजारांचा आकडा अवघ्या चार दिवसांत ओलांडत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या सात हजार 40 झाली आहे. दरम्यान, रविवारी (ता. 12) दिवसभरात 256 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही 332 झाली आहे. 

दिवसभरात 256 अहवाल पॉझिटिव्ह 

रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 256 रुग्णांमध्ये नाशिक शहरातील 209, तर ग्रामीण भागातील 47 रुग्णांचा समावेश आहे. सहा मृतांमध्येही चार शहरातील आणि चिंचोली (ता. सिन्नर) येथील 38 वर्षीय पुरुष व धुळ्यातील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातील चौघांमध्ये 36 वर्षीय पुरुष, देवळालीगाव येथील 63 वर्षीय पुरुष, बेलदरावाडी येथील 58 वर्षीय पुरुष व गौतमनगर येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सायंकाळी सव्वासहाला आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 862 अहवाल प्रलंबित होते. यापैकी 459 अहवाल ग्रामीण भागातील, तर नाशिक महापालिका हद्दीतील 292 व मालेगाव महापालिका हद्दीतील 111 अहवाल प्रलंबित होते. यापैकी काही अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले. 

नव्याने 829 संशयित दाखल 

कोरोनाशी निगडित लक्षणे असलेले 829 संशयित रुग्ण दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल झाले. यात, 596 रुग्ण नाशिकमधील, तर मालेगावचे 19, नाशिक ग्रामीणचे 136 आणि गृह विलगीकरणातील 78 रुग्णांचा समावेश आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com