फक्त दोनच प्रवासी विमानात...मग काय घेतली उड्डाण नाशिक-पुणे विमानाने!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

ओझर विमानतळ येथे लॅँडिंग होताच प्रत्येक प्रवाशाला एक अर्ज देण्यात आला. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, मागील चौदा दिवस कुठे काय केले? बाहेर देशात प्रवास झाला का? वैद्यकीय माहितीत प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला आहे का याची माहिती विचारली गेली.विमानतळाबाहेर येण्या आधी थर्मोमीटरने अंतर ठेवून प्रवाशाला ताप आहे की नाही याची कसून चौकशी केली जात होती.स्थानिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग, फ्लूची तपासणी करण्यात येत आहे. मोहीम ही १६ मार्चपासून सुरू आहे.

नाशिक : जनता कर्फ्यूमुळे देशांतर्गत विमानसेवेलाही झळ बसत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे २६ प्रवासी घेऊन आलेले हैदराबाद-नाशिक-पुणे हे ७० सीटचे विमान नाशिक विमानतळावर पोहोचले. पण पुढे मात्र त्याने केवळ दोन प्रवाशांना घेऊनच पुण्याला उड्डाण केले.

 केवळ दोन प्रवाशांना घेऊनच विमानाची उड्डाण! 

नाशिक विमानतळावर सकाळच्या वेळी ये-जा करणारी दोन विमाने आहेत. त्यात  प्रामुख्याने हैदराबाद व पुणे येते. हैदराबादहून नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या ७० आसनी विमानातून अवघे २६ प्रवासी आले, परंतु त्यातील २४ प्रवासी नाशिकला उतरल्यानंतर अवघे दोन प्रवासी घेऊन विमानाने पुण्याला उड्डाण केले. ओझर विमानतळ येथे लॅँडिंग होताच प्रत्येक प्रवाशाला एक अर्ज देण्यात आला. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, मागील चौदा दिवस कुठे काय केले? बाहेर देशात प्रवास झाला का? वैद्यकीय माहितीत प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला आहे का याची माहिती विचारली गेली.विमानतळाबाहेर येण्या आधी थर्मोमीटरने अंतर ठेवून प्रवाशाला ताप आहे की नाही याची कसून चौकशी केली जात होती.स्थानिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग, फ्लूची तपासणी करण्यात येत आहे. मोहीम ही १६ मार्चपासून सुरू आहे.

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik flight to Pune fly with only two passengers due to corona Nashik Marathi News