कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका "ऑन ऍक्‍शन मोड'! सर्वेक्षण करून आखणार उपाययोजना

nmc corona 123.jpg
nmc corona 123.jpg

नाशिक : पावसाळा सुरु झाल्यानंतर कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेवून केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली त्यानुसार शहराचे जुने भाग, झोपडपट्टी व दाट लोकसंख्येच्या भागाकडे अधिक लक्ष देण्याच्या सुचना दिल्याने त्यानुसार महापालिकेने ऍक्‍शन प्लॅन तयार केला असून दाट लोकसंख्येच्या भागाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. दाट लोकसंख्येच्या भागाचे सर्वेक्षण करून तेथे उपाययोजना आखल्या जाणार आहेत. 

दाट लोकसंख्येच्या भागाकडे विशेष लक्ष
देशात कोरोना संसर्गाचा आकडा एक लाख 31 हजारांपेक्षा अधिक झाला तर महाराष्ट्रात कोरोनाने पन्नास हजारी पार केली. लाखाच्या पुढे आकडा पोहोचल्याने त्यात पुढील महिन्यापासून पावसाला सुरुवात होईल. पावसाचे वातावरण संसर्गजन्य आजारांना पोषक असल्याने यात नव्याने आलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढणार असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. त्यामुळे देशात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने पायाभुत सुविधा उभ्या करण्याच्या सुचना राज्यांना दिल्या आहेत. यात शहरांतील जुने भाग, झोपडपट्टी परिसर, लोकसंख्येची उच्च घनता असलेले भाग, स्थलांतरीत कामगारांचे भाग आदींकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या. त्यानुसार नाशिक महापालिकेने कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत करण्यासाठी दाट लोकसंख्येच्या भागाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली असून या भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहे. 

शहरातील दाट लोकसंख्येचे भाग हे आहेत..
शहरातील जुने नाशिक भागात शहराच्या सुमारे 18 टक्के लोकसंख्या असून सर्वाधिक दाट लोकसंख्येचा भाग आहे. या भागात एकमेकाला लागुन घरे तर आहेचं शिवाय मजल्यावर मजले चढले आहेत. जुने नाशिक मध्ये 1,75,000 च्या पुढे लोकसंख्या आहेत. पुर्व विभागात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या वडाळा गाव, शिवाजी वाडी, उपनगर कॉलनी, आगर टाकळी व समता नगर. नाशिकरोड विभागात सुभाष रोड, देवळाली गाव, रोकडोबा वाडी, फर्नांडीस वाडी, पंचक गाव, उपनगर येथील कॅनॉल झोपडपट्टी, सिन्नर फाटा येथील स्टेशन वाडी. सातपूर विभागात महादेव वाडी, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, आनंदवली गाव, चुंचाळे शिवार, सिडकोतील मोरवाडी, कामटवाडे, उत्तम नगर. पंचवटी विभागात गोदाकाठचा परिसर, निलगिरी बाग, वाघाडी, वाल्मिक नगर. 

दृष्टीपथात महापालिकेची तयारी 
- सहाशे वैद्यकीय पथकांची नियुक्ती. 
- 70 हजार घरांपर्यंत पथके पोहोचणार. 
- तीन लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट. 
- जुने नाशिक भागात सर्वाधिक 1,75,000 लोकसंख्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com