VIDEO : "नागरिकांनो घरात बसा..तुमच्या भल्यासाठीच सर्व सुरु आहे" पोलीस वारंवार आवाहन करत होते तरीही..

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

सारडा सर्कल, द्वारका, नाशिक रोडचा बिटको चौक, अशोक स्तंभ, पंचवटी कारंजा, सीबीएस, शरणपूर रोड, मायको सर्कल, मुंबई नाका या भागात बंदचे वातावरण कसे असते हे पाहण्यासाठी युवकांच्या जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडले. पोलिसांना दंडुका उगारण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही. पोलिसांकडून शहरात नाकेबंदी करताना वाहनधारकांना पुन्हा घरी पाठवावे लागले. कॅनडा कॉर्नर, अशोक स्तंभ, सारडा सर्कल, द्वारका भागात पोलिसांनी बॅरिकेड्‌स उभारून शहरात येणारी वाहतूक दुपारनंतर बंद केली. ज्या भागात दुकाने सुरू होती, तेथे जावून बंदचे आवाहन करताना काही भागात दंडुका उगारल्याने अखेरीस संपूर्ण शहर बंद झाले.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नये त्यासाठी जमावबंदीचा कलम 144 लागु केल्यानंतरही काही अतिउत्साही तरुणांचे घोळके व दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने पोलिसांना अखेरीस दंडुका उगारावा लागला. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून घोळके पांगविण्याची वेळ आली. सरकारी कार्यालयांमध्ये 95 टक्के कट ऑफ व रुग्णालये वगळता सर्वचं व्यवसाय ठप्प झाले. 

Image may contain: one or more people, sky and outdoor

जमावबंदीतही जथ्थे रस्त्यावर; संचारबंदी जाहीर होताच बंद 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (ता. 22) नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला. त्यानंतर संध्याकाळी थाळीनाद करत कोरोना फायटर्सच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला. राज्य शासनाने दोन टप्प्यात जमावबंदीचा कलम 144 लागू केला. सोमवारी(ता. 23) दिवस सुरू झाल्यानंतर व्यवहार सुरळीत झाल्याचे समजत अनेक दुकाने सकाळपासून उघडली. पोलिसांनी आवाहन करूनही दुकाने बंद झाली नाही, तर नागरिक नियमित कामासाठी बाहेर पडले. सकाळच्या सुमारास कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती शहरात जाणवत होती. पोलिसांकडून वाहनांवरून बंदचे आवाहन केले जात होते, परंतु त्याला जुमानले गेले नाही.

पोलिसांना दंडुका उगारण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही

सारडा सर्कल, द्वारका, नाशिक रोडचा बिटको चौक, अशोक स्तंभ, पंचवटी कारंजा, सीबीएस, शरणपूर रोड, मायको सर्कल, मुंबई नाका या भागात बंदचे वातावरण कसे असते हे पाहण्यासाठी युवकांच्या जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडले. पोलिसांना दंडुका उगारण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही. पोलिसांकडून शहरात नाकेबंदी करताना वाहनधारकांना पुन्हा घरी पाठवावे लागले. कॅनडा कॉर्नर, अशोक स्तंभ, सारडा सर्कल, द्वारका भागात पोलिसांनी बॅरिकेड्‌स उभारून शहरात येणारी वाहतूक दुपारनंतर बंद केली. ज्या भागात दुकाने सुरू होती, तेथे जावून बंदचे आवाहन करताना काही भागात दंडुका उगारल्याने अखेरीस संपूर्ण शहर बंद झाले. 

Image may contain: one or more people, tree and outdoor

रविवार कांरजावर गर्दी 
रविवार कारंजा भागात किराणा मालाचे दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. संध्याकाळी किराणा भरण्यासाठी गर्दी उसळली. दुपारनंतर पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली. काही भागात भाजीपाला विक्री सुरू होता. तेथे काही प्रमाणात गर्दी होती, परंतु संध्याकाळी संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर भाजीपाला दुकाने बंद करण्यात आली. 

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

गर्दीच्या भागात अडचण 
पंचवटी भागातील फुलेनगर, जुने नाशिक, गंजमाळ आदी भागात छोटी घरे व अरूंद रस्ते असल्याने या भागात जमावबंदी किंवा संचारबंदी असूनही तरुणांचे टोळके दिसत होते. परंतु या भागात कारवाई करताना पोलिसांना अडचण आली. त्यामुळे काही प्रमाणात या भागाकडे दुर्लक्ष करताना रस्त्यावर येऊ न देण्याची काळजी पोलिसांनी घेतली. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik police active on people who created violation Nashik marathi News