नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर सावधान! प्रवाशांचा जीव धोक्यात

राजेंद्र अंकार
Wednesday, 30 September 2020

नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर सावधान! कारण इथे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. लॉकडाउनमुळे गेल्या पाच महिन्यांत या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. पण आता वाहतुक पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे.

नाशिक / सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर सावधान! कारण इथे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. लॉकडाउनमुळे गेल्या पाच महिन्यांत या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. पण आता वाहतुक पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे.

नाशिक-पुणे महामार्ग खड्ड्यात, प्रवासी धोक्यात 

नाशिक-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. शिंदे येथील टोलनाक्यावरून पुण्याकडे निघाल्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लॉकडाउनमुळे गेल्या पाच महिन्यांत या मार्गावर फारशी वर्दळ नव्हती. सिन्नर परिसरात असलेल्या दोन औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नरपर्यंत या रस्त्यावरून जड मालवाहतूक होत असल्याने रस्ता आणखीनच खराब होऊन तो जागोजागी फुटला आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अपघाताची भीती
परिसरात अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांचे खड्डे पडल्याने अनेक अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. शिंदे टोलनाका सोडल्यानंतर सिन्नरच्या दिशेने मोह गावापासून मोहदरी घाटातही अनेक खड्डे पडले आहेत. चिंचोलीजवळील विश्वेश्वरय्या महाविद्यालयासमोरील रस्ता संपूर्णपणे फुटल्याने जोरात येणाऱ्या वाहनांचा वेग फारच कमी होतो. त्यामुळे मागून येणारे वाहन धडकण्याची भीती असते. मोहदरी घाट चढून वर आल्यानंतर अनेक खड्डे पडले आहेत. माळेगाव एमआयडीसीपासून तर रस्त्याची स्थिती बिकटच म्हणावी लागेल. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच कमी असल्याने औद्योगिक क्षेत्रातील असंख्य कामगार दुचाकीने कामावर येतात. कर्मचारी रात्री-अपरात्री कंपनीची कामे आटोपून घरी येतात. या महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असल्याने त्यांना अपघाताची भीती वाटत असते. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Pune highway full of potholes nashik marathi news