मिशन 'स्वच्छ सर्वेक्षण'साठी प्रशासन सज्ज; कचरा दिसल्यास दहापट दंड आकारणी

SMARTC.jpg
SMARTC.jpg

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुढील वर्षी पहिल्या दहा शहरांमध्ये क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने तयारी करताना कचऱ्याची व्यवस्थापन व विल्हेवाट योग्य रीतीने होण्यासाठी नागरिकांना होम कंपोस्टिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

अन्यथा दहापट दंडाची आकारणी 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केल्या वर्षी नाशिक शहर देशात अकरावे, तर राज्यात नवी मुंबईपाठोपाठ दुसरा क्रमांक आला होता. बांधकामातील ढिगाऱ्याची ऐनवेळी निविदा न निघाल्याने क्रमांक घसरला त्यामुळे डेब्रिजचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय दोन घंटागाड्यांची व्यवस्था करताना प्रतिटन आठशे रुपये दराने बांधकामाचा कचरा उचलण्याची सोय केली. त्यानंतरही जागेवरच कचरा दिसल्यास एकूण वजनाच्या दहापट दंडाची आकारणी केली जाणार आहे. 

होम कंपोस्टिंगला चालना देण्याचा निर्णय

पुढील वर्षाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा भर असून, घंटागाड्यांव्यतिरिक्त होम कंपोस्टिंगला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीदेखील होम कंपोस्टिंग उपक्रम राबविला होता. त्या वेळी प्रतिदिन ९७ किलो कचरा व्यवस्थापन होत असल्याचे आढळून आले होते. शहरातील लोकसंख्येचा विचार करता व पर्यावरणावर पडणारा ताण लक्षात घेता कचरा व्यवस्थापन या उपक्रमामुळे सोपे झाले होते. 

नागरिकांनो, सहभाग नोंदवा!

होम कंपोस्टिंग उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. घरच्या घरी होम कंपोस्ट केल्यास कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होऊन, कंपोस्ट खत घराच्या परिसरातील उद्यानामध्ये वापरता येईल. होम कंपोस्टिंगमुळे कचऱ्याचे मूळ ठिकाणी व्यवस्थापन होईल त्याशिवाय पर्यावरणावरचा ताण कमी करणे शक्य होईल. शहरातील सामाजिक, पर्यावरण, अशासकीय संस्थांनी पुढे येऊन होम कंपोस्टिंगबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com