नाशिककर गारठले! राज्यातील सर्वांत  कमी किमान तापमानाची नोंद 

महेंद्र महाजन
Saturday, 14 November 2020

१७ नोव्हेंबरपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. आज मालेगावमध्ये १५.२, जळगावमध्ये १४.२, तर महाबळेश्‍वरमध्ये १६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असताना युरोपियन देशांमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने आरोग्य विभागाने स्थानिक पातळीवर तयारी करण्याची सूचना देण्यात आली होती.

नाशिक : दीपांनी आसमंत उजळले असताना कृषीपंढरी नाशिक जिल्ह्यातील पारा गुरुवारपर्यंत (ता. १२) १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. शुक्रवारी (ता. १३) राज्यातील सर्वांत कमी तापमान नाशिकमध्ये नोंदवले गेले असून, किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारपासून (ता. १४) दीपोत्सवात पारा १५ अंश सेल्सिअसच्या पुढे राहणार आहे. 

दीपोत्सवात पारा १५ अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज 
किमान तापमान १६ अंश सेल्सिअस शनिवारी (ता. १४), १५ अंश सेल्सिअस तापमान रविवारी (ता. १५) आणि सोमवारी (ता.१६) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच १७ नोव्हेंबरनंतर पुढे १५ अंश सेल्सिअसच्या खाली पारा घसरण्याचा अंदाज आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. आज मालेगावमध्ये १५.२, जळगावमध्ये १४.२, तर महाबळेश्‍वरमध्ये १६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असताना युरोपियन देशांमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने आरोग्य विभागाने स्थानिक पातळीवर तयारी करण्याची सूचना देण्यात आली होती.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर कमी तापमान, खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषणाची पातळी वाढणार नाही, यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Record the lowest minimum temperature marathi news