PHOTOS : नाशिककरांकडून 'दिव्यां'चा लखलखाट...पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सहकुटुंब प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी (ता. 5) नाशिककरांनी उत्स्फूर्त साथ दिली. कोरोना उच्चाटनाच्या घोषात दिव्यांनी लखलखून निघाले. रात्री नऊला सहकुटुंब बाल्कनी, इमारतीच्या गच्चीवर येत दिव्यांचा लखलखाट केला. कोरोना विषाणू उच्चाटनाचा घोष या वेळी नाशिककरांनी केला. 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी (ता. 5) नाशिककरां नी उत्स्फूर्त साथ दिली. कोरोना उच्चाटनाच्या घोषात दिव्यांनी लखलखून निघाले. रात्री नऊला सहकुटुंब बाल्कनी, इमारतीच्या गच्चीवर येत दिव्यांचा लखलखाट केला. कोरोना विषाणू उच्चाटनाचा घोष या वेळी नाशिककरांनी केला. 

रात्री नऊला घरातील सर्व दिवे विझून बालकनीत कुटुंबीय

यापूर्वी टाळी व थाळी वाजविण्याच्या आवाहनालाही नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) रात्री नऊला दिवे, मोबाईलची टॉर्च लावत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यास नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळपासून दिवे पेटविण्या संदर्भात तयारी सुरू होती. रात्री नऊला घरातील सर्व दिवे विझून घराच्या बालकनीत सर्व कुटुंबीय एकवटले. नंतर दिव्यांच्या रोषणाईत आसमंत न्हाहून निघाले होते. दिवे पेटविताना "गो कोरोना गो, कोरोना गो'चा नारा नाशिककरांनी दिला. इमारतींच्या गॅलरीमध्ये येत पेटविलेले दिवे मनमोहक ठरत होते. घरातील लहानांपासून ज्येष्ठां पर्यंत सर्वांनीच उपक्रमात सहभाग नोंदविला होता. शहरातील विविध भागांमध्ये ऊर्जावर्धक चित्र बघायला मिळाले. 

Image may contain: one or more people, fire and night

Image may contain: 2 people

सोशल मीडियावर झगमगाट 

नऊ मिनिटांपर्यंत सारे काही विसरून नाशिककर दिव्यांच्या उजेडात उभे होते. कोरोनाचा नायनाट होईल, असा आशावाद व्यक्‍त करताना या विषाणू विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला. नऊ मिनिटे पूर्ण होताच, या उपक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यामुळे रात्री उशिरा सोशल मीडियावर पेटत्या दिव्यांचा झगमगाट झाला होता. व्हॉट्‌सऍप, फेसबुकच्या स्टेटसवर, वॉलपोस्टवर हे फोटो अपलोड करताना नेटकऱ्यांमध्ये उत्साह जाणवत होता.  

Image may contain: 4 people, night and fire

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक

Image may contain: 7 people, people standing, night and fire

Image may contain: one or more people, fire, night and indoor

एक दिवा भारताच्या एकजुटीसाठी
 

अशोका मार्ग, डीजीपीनगर, उपनगर, बोधलेनगर नाशिक रोड या भागात "एक दिवा भारताच्या एकजुटी'साठी या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. अनेक सोसायट्या, वसाहतींमध्ये नागरिक व महिलांनी दिवे लावून महामृत्युजय मंत्र जप आणि शंख नाद करून "गो कोरोना', "भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या व अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेचे आभार मानले.  

Image may contain: 1 person, standing, night and outdoor

Image may contain: 4 people, night

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashikites support PM Modi's call for lamps nashik marathi news