थरारक! एकच चप्पल.. मोटरसायकलही विहिरीजवळ...भलत्याच संशयाने गावकऱ्यांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

त्याची मोटारसायकल मावसभावाच्या शेतातील विहिरीजवळ आढळून आली. एक चप्पल विहिरीत पडली असल्याने ललित घुगे यांनी तत्काळ मामा राजेंद्र पालवे यांना ही माहिती दिली. राजेंद्र पालवे सकाळी दहाच्या सुमारास चिंचोलीत पोचले. त्यावेळी त्यांनी जे काही पाहिले ते धक्कादायक होते.

नाशिक : त्याची मोटारसायकल मावसभावाच्या शेतातील विहिरीजवळ आढळून आली. एक चप्पल विहिरीत पडली असल्याने ललित घुगे यांनी तत्काळ मामा राजेंद्र पालवे यांना ही माहिती दिली. राजेंद्र पालवे सकाळी दहाच्या सुमारास चिंचोलीत पोचले. त्यावेळी त्यांनी जे काही पाहिले ते धक्कादायक होते.

अशी घडली घटना

नाशिक येथील श्रमिकनगर मध्ये राहणाऱ्या रितेश राजेंद्र लाडवंजारी (वय 21) याची मोटारसायकल (एमएच 15, एफजी 3093) चिंचोली शिवारातील ललित घुगे (मावसभाऊ) यांच्या शेतातील विहिरीजवळ आढळून आली. एक चप्पल विहिरीत पडली असल्याने ललित घुगे यांनी तत्काळ भिलवाडी (ता. मुक्ताईनगर) येथील त्यांचे मामा राजेंद्र पालवे यांना ही माहिती दिली. राजेंद्र पालवे सकाळी दहाच्या सुमारास चिंचोलीत पोचले. त्यावेळी त्यांनी विहिरीतून काढलेला युवकाचा मृतदेह पाहिला असता, तो त्यांचा भाचा रितेश लाडवंजारीचा असल्याचे त्यांनी ओळखले. यासंदर्भात पालवे यांनी एमआयडीसी पोलिसांत खबर दिली. याने चिंचोली (ता. जळगाव) शिवारातील मावसभावाच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 22) सकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली. या युवकाने आत्महत्येपूर्वी हाताची नस कापल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. 

आत्महत्येपूर्वी लिहिला आई-वडिलांचा नंबर 
रितेशने आत्महत्येपूर्वी त्याच्या मोटारसायकलच्या डिक्कीत आई-वडिलांचा मोबाईल नंबर कागदावर लिहिला होता. रितेशशी घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता, तो घातपात नसून त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. 

घातपाताचा संशय 
मृत रितेश लाडवंजारी हा गुरुवारी (ता. 21) रात्री दहाच्या सुमारास नाशिकहून मोटारसायकलने चिंचोलीला येण्यासाठी निघाला होता. त्यानंतर सकाळी पावणेसातच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला. रितेशने आपल्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

पोलीसांची घटनास्थळी धाव 
माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक लोकरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नंतर सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौक, भूषण सोनार यांनी पोलिसपाटील मुकेश पोळ यांच्यासाह नागरिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.  

हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik,s young boy commits suicide in Jalgaon nashik crime marathi news