"निसर्ग"चक्रीवादळ येतयं..पण घाबरू नका अशी घ्या काळजी...जिल्हाधिकारींकडून आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

 "निसर्ग"चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.. दिनांक 04 जुन 2020 च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील काही भागात  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकमध्ये मध्यरात्री पासून रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत, कोरोना अन् पाऊस असतानाही नाशिककराची दैनंदिन कामे सुरू आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक 

नाशिक : "निसर्ग"चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे..IMD हवामान विभागाच्या अंदाजानुसार "निसर्ग" चक्रीवादळ मंगळवार आणि बुधवारी 2 ते 3 जून रात्री महाराष्ट्रावर धडकणार आहे. दिनांक 04 जुन 2020 च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील काही भागात  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
सदर कालावधीत वाऱ्याचा वेग जास्त राहील तसेच मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

नाशिकमध्ये मध्यरात्री पासून रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत, कोरोना अन् पाऊस असतानाही नाशिककराची दैनंदिन कामे सुरू आहेत.रिमझिम पावसापासून बचाव करत नागरिक छत्री,रेनकोट घेऊन घराबाहेत पडत असल्याची शहर व परिसरातील दृश्ये. (छायाचित्रे केशव मते)

Image may contain: 1 person, motorcycle and outdoor

तरी सर्व नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी...जिल्हाधिकारींचे आवाहन

1.दिनांक 03 व 4 जुन 2020 रोजी  अतिवृष्टीमुळे  घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
2. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व  सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.
3.घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशापासुन लांब रहावे.
4.आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे  किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.
5.आपले जवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु आपल्या सोबत ठेवाव्यात .
6.हवामान खात्याकडून मिळणारे इशारे  व माहितीसाठी जवळ रेडीओ बाळगावा व त्याद्वारे माहिती घ्यावी .
7. सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
8.बाल्कनी मधील  हँगिंग किंवा लाइट मटेरियल उदा.फुलांची भांडी, कुंड्या व इतर जड साहित्य तात्काळ सुरक्षित कराव्यात.
9.काचेच्या खिडक्या ढिल्या असतील तर तात्काळ दुरुस्त करा तसेच दाराच्या पॅनेलची तपासणी करुन ती दुरुस्त करा.
10.वाहनावर झाडे व इतर साहित्य पडू नये यासाठी वाहने सुरक्षित करा.  दुचाकी मुख्य स्टँडवर उभी करा.
11.प्रथोमोचार किट, बॅटरी, पॉवर बँक   चार्जिंग करून ठेवा. जखमांसाठी आवश्यक औषधे व आजारी रुग्णाची औषधे सुरक्षित रुग्णाच्या बेड जवळ ठेवा. 
12.विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटर साठी इंधनाचा पुरवठा असावा.
13.वॉटर प्युरिफायरमध्ये विजेचे नुकसान झाल्यास पुरेसे पिण्याचे पाणी साठा करून ठेवा.
 14.शुजरॅक चांगल्या प्रकारे बोल्ट कराव्यात, सर्व शूज व इतर वस्तू चांगल्या प्रकारे एकत्र करून सुरक्षित केल्या पाहिजेत.
15.डिश टीव्ही व्यवस्थित घट्ट किंवा पक्के करा. 
 16.एअर-कंडिशनर बाह्य युनिट्स पक्के करून घ्या .
17.  शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
18.विनाकारण  घराबाहेर पडू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका.
19. झाडाखाली उभे राहू नका व झाडाखाली वाहने लावू नका.
21.पत्र्याच्या शेड खाली उभे राहू नका
22. सद्यस्थितीत जिल्ह्यात Home Quarantine असलेले नागरीक यांच्यासाठी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षीतस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे.

Image may contain: one or more people and outdoor

संपर्क साधा

तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, स्थलांतरीत ठिकाणी विना मास्क फिरू नये. सॅनिटायझरचा वापर करावा.अधिक माहिती साठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलयं 

Image may contain: 1 person, sitting, motorcycle, shoes and outdoor

Image may contain: 1 person, walking, child and outdoor

Image may contain: car, motorcycle and outdoor

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Nature" hurricane don't be afraid, be careful appeal from the Collector nashik marathi news