VIDEO : जेएनयू हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन...पोलीसांकडून कार्यकर्त्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. नाशिक, मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्येही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यालय आवारात आंदोलन करण्यात आले. "विद्यार्थ्यांवर पूर्वनियोजित व संघटितपणे भ्याड हल्ला केला गेला. या लोकशाहीविरोधी गुंडागर्दीचा निषेध" अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीसांतर्फे अटकही करण्यात आली.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

हल्ल्याविरोधात तीव्र संताप

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. नाशिक, मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जेएनयुच्या विद्यार्थ्यांवरील हल्ला..

रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

Image may contain: 5 people, including Sanjay Bhalerao, people smiling, outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP agitation against JNU students attack Nashik Marathi News