राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा म्हणतात..."भाजप नेत्यांनी लवकर सभ्यतेचा मार्ग धरावा"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

आमदार राम कदम दहीहंडीच्या कार्यक्रमात तरूणांना लग्नासाठी जी मुलगी आवडेल तिला पळवुन आणण्याची भाषा करतात. यातून या पक्षाची संस्कृती प्रकट होते. सत्तेत असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दारूची विक्री वाढवण्याची शक्कल म्हणून दारुच्या बाटल्यांना महिलांची नावे द्यावीत, असे विधान केले होते. मागील पाच वर्ष भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असताना या सरकार मधील मंत्र्यांच्या महिलांविषयी काय भावना आहेत हे नेहमीच यांच्या कार्य प्रणालीद्वारे, भाषणातून दिसून येते. असे देखील भामरे म्हणाले.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लवकर सभ्यतेचा मार्ग धरावा हेच बरे आहे..महिलांविषयी ते कही पे निगाहे, कही पे निशाणा असे बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांनी महिलांना जरी हिरोईन म्हटले तरी ते महिलांसाठी हिरो होणारच नाही. अशा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी बबनराव लोणीकर यांना लगावला असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लवकर सभ्यतेचा मार्ग धरावा - भामरे

आमदार राम कदम दहीहंडीच्या कार्यक्रमात तरूणांना लग्नासाठी जी मुलगी आवडेल तिला पळवुन आणण्याची भाषा करतात. यातून या पक्षाची संस्कृती प्रकट होते. सत्तेत असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दारूची विक्री वाढवण्याची शक्कल म्हणून दारुच्या बाटल्यांना महिलांची नावे द्यावीत, असे विधान केले होते. मागील पाच वर्ष भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असताना या सरकार मधील मंत्र्यांच्या महिलांविषयी काय भावना आहेत हे नेहमीच यांच्या कार्य प्रणालीद्वारे, भाषणातून दिसून येते. असे देखील भामरे म्हणाले.

Image may contain: 1 person, selfie and closeup

आमदार लोणीकरांची महिलांना बघण्याची नजर स्पष्ट होते - भामरे 

त्या पुढे म्हणाल्या..यावर आता आमदार लोणीकर शेतकरी मोर्चासाठी गर्दी व्हायला पाहिजे म्हणून एखादी चित्रपट अभिनेत्री ( हिरोइन ) आणू या किंवा हिरोइन नाही मिळाली तर आपल्याच तालुक्‍याच्या तहसीलदार आहेतच, असे वक्तव्य करतात. यातून या नेत्यांची महिलांना बघण्याची नजर स्पष्ट होते. खरं तरं नेत्यांनी महिलांविषयी बोलतांना भान ठेवायला पाहिजे. आपल्याला जन्म देणारी एक महिलाच आहे. आपल्या घरात पत्नी, बहिण, मुलगी याही महिलाच आहेत.

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

Image may contain: Sanjay Bhalerao, smiling, closeup

महिलांची माफी मागावी

सत्तेत नसल्याने आपली जीभ घसरली असावी. त्यांनी महिलांचा उद्रेक होण्याआधीच महिला तहसीलदार, समस्त महिलांची माफी मागावी. कारण आपण जरी महिलांना हिरोईन समजता तरी महिला मात्र आपल्याला हिरो समजत नसून भाऊच समजता, तेव्हा मोठे मन करा आणि महिलांची माफी मागा असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता महेश भामरे प्रसिध्दीस तसेच सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader criticism Babanrao Lonikar and BJP leaders Nashik Marathi News