VIDEO : सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांचा तीव्र निषेध

रोशन खैरनार
Tuesday, 26 January 2021

‘केंद्र सरकार मुर्दाबाद’, मोदी सरकार हाय-हाय’, ‘अन्यायकारक तिन्ही कृषी कायदे त्वरित रद्द करा’ अशी घोषणाबाजीने शहर व परिसर दणाणून गेला होता. ट्रॅक्टर रॅलीचे तहसील आवारात आगमन होताच शेतकर्‍यांनी ठिय्या दिला. 

सटाणा (जि.नाशिक) : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात लादलेले तिन्ही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी दिल्ली येथे गेल्या साठ दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन व ट्रॅक्टर मार्चला पाठिंबा देण्याकरिता तसेच देशातील वाढती बेरोजगारी व महागाईला जबाबदार असलेल्या केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार (ता.२६) रोजी प्रजासत्ताक दिनी येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिर ते बागलाण तहसील कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीत १००हून अधिक ट्रॅक्टरवर सहभागी झालेल्या कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

सटाण्यात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली
आज सकाळी अकरा वाजता येथील आरम नदीपात्रालगत यात्रा पटांगणात सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुक्यातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह एकत्रित आले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या रॅलीत ट्रॅक्टरवर बसून माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींसह कार्यकर्त्यांच्या ‘केंद्र सरकार मुर्दाबाद’, मोदी सरकार हाय-हाय’, ‘अन्यायकारक तिन्ही कृषी कायदे त्वरित रद्द करा’ अशी घोषणाबाजीने शहर व परिसर दणाणून गेला होता. ट्रॅक्टर रॅलीचे तहसील आवारात आगमन होताच शेतकर्‍यांनी ठिय्या दिला. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
यावेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले, केंद्र शासनाने लादलेले तिन्ही अन्यायकारक कृषी कायदे लागू झाल्यास देशातील शेतकरी मोठ्या कंपन्यांचे गुलाम होतील. शेती त्यांची असली तरी ते मालक राहणार नाहीत. गेल्या साठ दिवसांपासून दिल्लीमध्ये ऊन, वारा व कडाक्याच्या थंडीशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची सरकारला कोणतीही जाणीव नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या असून अर्थव्यवस्था डबघाईस आल्याने देशात बेरोजगारीही वाढली आहे. सत्तेत आल्यापासुन शेतकरी विरोधी धोरण राबविणार्‍या मोदी सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही श्री.चव्हाण यांनी दिला. नायब तहसिलदार पी.एस.नेरकर व पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

Image

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
रॅलीत विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, केशव मांडवडे, जिभाऊ सोनवणे, ज.ल.पाटील, रायुकाँचे शहराध्यक्ष सुमित वाघ, रोहित अहिरे, भारत खैरनार, दिनेश सोनवणे, रत्नाकर सोनवणे, वंदना भामरे, उषा भामरे, नगरसेविका सुरेखा बच्छाव, परशुराम पाकळे, जनार्दन सोनवणे, संजय पवार, झिप्रू सोनवणे, भाऊसाहेब भामरे, गणेश पवार, अरुण सोनवणे, विजय भांगडीया, पपू वाघ, वैभव गांगुर्डे, राजेन्द्र सावकार, दिनेश सोनवणे, सुरेश सोनवणे, आनंद सोनवणे, हरीभाऊ खैरनार, फाईम शेख, सुभाष पाटील, जिभाऊ बच्छाव, सुनील दंडगव्हाळ, अशोक देवरे, लक्ष्मण देवरे, एस.टी.देवरे, भिकाजी सोनवणे, रावण देवरे, ताराचंद वाघ, टोनी मोरे, किरण बिरारी, पिंटू गांगुर्डे, दगा सावळा, मोठाभाऊ बच्छाव, सहादू गांगुर्डे आदींसह शेतकरी सहभागी होते. 

Image

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP tractor rally on Republic Day in Satana nashik marathi news