"एनडीए''ची परीक्षा स्थगित; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निर्णय

NDA exam.jpg
NDA exam.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विविध अभ्यासक्रमांशी निगडित परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांची यादी वाढत चालली आहे. या यादीत आणखी एका परीक्षेची भर पडली आहे. राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) प्रवेशासाठी नियोजित असलेली परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याची सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केली आहे. 

येत्या 19 एप्रिलला एनडीए-1- 2020 ही परीक्षाचे होते नियोजन

यापूर्वी सीए अभ्यासक्रमाची तसेच वैद्यकीय प्रवेशाची "नीट', अभियांत्रिकीची "जेईई' यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा स्थागित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या 19 एप्रिलला एनडीए-1- 2020 ही परीक्षा नियोजित होती. राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असते. ही परीक्षा कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, पुढील आदेशापर्यंत स्थगित केली असल्याची सूचना जारी केली आहे. सुधारीत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com