मालेगावात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; आढळले ६० नवे रुग्ण

प्रमोद सावंत
Sunday, 4 October 2020

द्याने येथील या महिलेला २३ सप्टेंबरला दाखल केले होते, २५ सप्टेंबरला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला दरम्यान उपचार सुरू असताना रात्री मृत्यू झाला. त्यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या १५८ झाली आहे

नाशिक/मालेगाव : शहर व तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित व कोरोनाबळींची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र शनिवारी (ता. ३) आठवड्यानंतर शहर व तालुक्यात तब्बल ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातच महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या ४६ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

द्याने येथील या महिलेला २३ सप्टेंबरला दाखल केले होते, २५ सप्टेंबरला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला दरम्यान उपचार सुरू असताना रात्री मृत्यू झाला. त्यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या १५८ झाली आहे. शनिवारी नव्याने ६० कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील ५०, तर ग्रामीण भागातील दहा जणांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात नवीन १७ रुग्ण दाखल झाले. शहरातील गृहविलगीकरणासह कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४३९ आहे. शहरातील अवघे १४६ अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ४२७ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

दिवसभरात आढळलेल्या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार २७६, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात २०३, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात १७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२, तर जिल्हा रुग्णालयात दहा संशयित दाखल केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ३३८ अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी ९८८ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 60 coprona patients found in malegaoan nashik marathi news