नव्या शैक्षणिक धोरणामुळे अंगणवाडी सेविकांवर टांगती तलवार 

 New education policy anganwadi sevika jobs are in risk
New education policy anganwadi sevika jobs are in risk

नाशिक : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार हा फॉर्म्युला अमलात आणण्याचा निर्णय  घेतला आहे. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर २०२२ पासून नवीन धोरण देशभरात लागू होणार आहे. परंतु या धोरणात पहिल्या पाच वर्षांमधील पहिले तीन वर्षे खेळ, मनोरंजनाबरोबरच विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात गोडी लागावी, यासाठी राहणार असल्याने जुन्या शैक्षणिक फॉर्म्युल्यानुसार विचार करता अंगणवाडीचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु  यामुळे अंगणवाडी सेविकांबरोबरच त्यांना मदत करणाऱ्या सेविकांना शैक्षणिक धोरणात सामावून घेतले जाणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने राज्यभरातील दोन लाखांहून अधिक सेविका व मदतनिसांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार राहणार आहे. 

गेल्या ३४ वर्षांपासून देशभरात दहा अधिक दोन, हा शैक्षणिक फॉर्म्युला चालत आलेला आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला, कौशल्य व रोजगाराचेदेखील शिक्षण मिळाले पाहिजे  व देशाच्या विकासदराशी शिक्षणाचा संबंध जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असली तरी लोकसभा व राज्यसभेची मंजुरी व पुढे प्रत्येक राज्याची मंजुरी, असा फेरा या नव्या शैक्षणिक धोरणाला पूर्ण करावा लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार, असा फॉर्म्युला निश्चि त करण्यात आला आहे. 

काय आहे नवे शैक्षणिक धोरण?
नव्या शैक्षणिक धोरणातील पहिल्या पाच वर्षांतील पहिले तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाणार आहे. हे  विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्याबरोबरच खेळ, मनोरंजन व कला गुण विकसित करण्यासाठी राहणार आहेत. जुन्या शैक्षणिक धोरणात पहिली ते पाचवी, असा प्राथमिक शिक्षणाचा टप्पा होता. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बालवाडी संकल्पना पुढे आली. पुढे शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत गटासाठी अंगणवाडी  संकल्पना अमलात आणली गेली. नव्या शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश पहिल्या पाच वर्षांत करण्यात आल्याने बालवाडी किंवा अंगणवाडी संकल्पना संपुष्टात येणार असल्याने या परिस्थितीमध्ये राज्यभरात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत व शहरी भागात महापालिकांच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनिसांचा  विचार अद्यापपर्यंत झालेला नाही. 

दृष्टिक्षेपात राज्यातील अंगणवाड्या 
- राज्यात ९७ हजार २६० अंगणवाड्या 
- ११,०८४ मिनी अंगणवाड्या 
- दोन लाख सेविका व मदतनीस 
- चार हजार पर्यवेक्षक 
 
नाशिक जिल्ह्यातील स्थिती 
- एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ५५३ अंगणवाड्या 
- चार हजार ५०० अंगणवाडीसेविका, चार हजार ५०० मदतनीस 
 
नाशिक महापालिकेच्या अंगणवाड्या 
- ३५५ अंगणवाडी 
- ३५५ सेविका, ३५५ मदतनीस, सहा मुख्य अंगणवाडीसेविका

संपादन- रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com