बारा तासांनी ओसरला गिरणेचा पूर; पूरपाण्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याला पाणी 

प्रमोद सावंत
Monday, 21 September 2020

कसमादे पट्ट्यात शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर आला. पूरपाण्यामुळे गिरणा धरणाचे सर्व दरवाजे सकाळी दहा फुटापर्यंत उघडले होते. सुरवातीला ५० हजार क्यूसेक नंतर ६० हजार व दुपारी ७० हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

नाशिक / मालेगाव : कसमादे पट्ट्यात शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर आला. पूरपाण्यामुळे गिरणा धरणाचे सर्व दरवाजे सकाळी दहा फुटापर्यंत उघडले होते. सुरवातीला ५० हजार क्यूसेक नंतर ६० हजार व दुपारी ७० हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

 

दुपारी तीननंतर गिरणा नदीचे पूरपाणी ओसरले. त्यामुळे सायंकाळी धरणातून आठ हजार ५०० क्यूसेक पाणी सोडले जात होते. कसमादे पट्ट्यात झालेल्या पावसामुळे चणकापूरमधून ९०८, हरणबारीतून ७२३, नाग्या-साक्या धरणातून एक हजार १३०, पुनंदमधून एक हजार २९६, तर ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यातून चार हजार ५२६ क्यूसेक पाणी गिरणा नदीत सोडले जात होते.

 

हरणबारी धरणातून ५२३ क्यूसेक पाणी मोसम नदीत वाहत होते. सकाळी पूरपाणी वाढल्याने प्रथमच गिरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडले. सायंकाळपर्यंत कसमादे पट्ट्यात पावसाने विश्रांती घेतली होती. उकाडा वाढल्याने पुन्हा पाऊस होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. गिरणा नदीच्या पूरपाण्यामुळे गिरणा डाव्या व उजव्या कालव्याला पाणी आले आहे.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about girna dam nashik marathi news