#Lockdown : त्यांची पायपीट "कोरोना'पेक्षाही भयंकर...घरच्या ओढीनं मिळेल त्या मार्गाने पुढे  पाहा PHOTOS

केशव मते : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 30 March 2020

मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-पुणे, नाशिक-गुजरात या महामार्गांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे जाणारा आग्रा महामार्ग आणि गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावरील वर्दळ वाढली आहे. चेकपोस्टवर अडकून पडण्याची शक्‍यता वाटताच, कष्टकऱ्यांना आडमार्गाने चेकपोस्ट चुकवत मार्गक्रमण करावे लागत आहे. कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर भागातून मालेगाव, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे निघालेले जथ्ये येवलावासीयांनी पाहिले आहेत. रिकाम्या खुल्या कंटेनरमधून मजूर प्रवास करत असल्याचे आज येवल्यात अनेकांनी पाहिले

नाशिक : देशभरातील कष्टकरी "लॉकडाउन'मध्ये घराच्या ओढीने सैरभैर झालेले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरीत पोचलेल्या जथ्यामुळे हे विदारक चित्र पुढे आलंय. डोईवर संसाराचा बोजा, कडेवर लेकरू अन्‌ मिळेल तो मार्ग... या त्रिसूत्रीच्या भरवशावर गावाच्या ओढीनं निघालेल्या या कष्टकऱ्यांची पायपीट "कोरोना'पेक्षाही भयंकरच आणि संवेदनशील मनाला सुन्न करणारी आहे. त्यातून मानवतेच्या संघर्षाचे संकट अधिकच गडद झाल्याचे चित्र पुढे आले. 

घरच्या ओढीनं मिळेल त्या मार्गाने पुढे सरकताहेत स्थलांतरितांचे लोंढे 
स्थलांतरित कष्टकऱ्यांचा अभ्यास करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशात पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित करणाऱ्यांची संख्या 20 कोटींच्या आसपास आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन कोटी जणांचा समावेश आहे. अशांच्या प्रश्‍नांची स्वयंसेवी संस्थांनी मांडणी करूनही त्याकडे फारशा गांभीर्याने न पाहणाऱ्या सरकारने "लॉकडाउन'चा निर्णय जाहीर करताना त्यांना पुरेसा वेळही दिलेला नाही. हाताला काम उरलेले नसताना रेशनचा प्रश्‍न गंभीर झाला. खिशात पुरेसे पैसे नसतानाच मध्यरात्रीपासून वाहतूकसेवा बंद झाली. त्यामुळे कष्टकऱ्यांपुढे घराचा रस्ता धरण्याखेरीज पर्यायच उरला नाही. 

Image may contain: 3 people, outdoor

इगतपुरी, सिन्नर बनले आव्हानात्मक 
नाशिकमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या मुंबई आणि पुणे भागातील स्थलांतरितांमुळे इगतपुरी, सिन्नर आव्हानात्मक बनले आहे. सिन्नर भागात आडवाटेने चाळीस जण पोचल्याची माहिती पोचताच प्रशासनाने त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. नगरच्या सीमेवरून येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी नाशिकच्या प्रशासनाने नगरच्या प्रशासनाशी संवाद साधला. मुंबई-आग्रा महामार्गावरून नंदुरबारकडे कष्टकऱ्यांचे जथ्ये दिवसभर पुढे सरकत होते. कपड्यांनी स्वतःचे आणि मुलांचे नाक-तोंड झाकून, लेकरांची तहान भागावी म्हणून त्यांच्या हातात पाण्याची बाटली, असे हृदयाला घर पडणारे चित्र त्यातून पाहावयास मिळाले. 

Image may contain: 1 person, standing, shoes, sky, hat, beard and outdoor

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशकडे वाढली वर्दळ 
मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-पुणे, नाशिक-गुजरात या महामार्गांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे जाणारा आग्रा महामार्ग आणि गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावरील वर्दळ वाढली आहे. चेकपोस्टवर अडकून पडण्याची शक्‍यता वाटताच, कष्टकऱ्यांना आडमार्गाने चेकपोस्ट चुकवत मार्गक्रमण करावे लागत आहे. कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर भागातून मालेगाव, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे निघालेले जथ्ये येवलावासीयांनी पाहिले आहेत. रिकाम्या खुल्या कंटेनरमधून मजूर प्रवास करत असल्याचे आज येवल्यात अनेकांनी पाहिले. 

Image may contain: one or more people, child and outdoor

हेही वाचा > ब्रेकिंग : नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण
 
प्रशासनाकडून स्थानिकांच्या अपेक्षा 
लॉकडाउनच्या काळात मिळेल त्या रस्त्याने पुढे जाणाऱ्या कष्टकऱ्यांना स्थानिक मदत करताहेत. जेवण-पाण्याची व्यवस्था करताहेत. पण आता मानवतेच्या या भावनेच्या पलीकडे जाऊन स्थलांतरित प्रत्येकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी, त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा स्थानिक मंडळी प्रशासनाकडून करत आहेत. 

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​
 Image may contain: one or more people, people standing and outdoor
नाशिकमध्ये पाच लाख स्थलांतरित 
नाशिकमध्ये 2013-14 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात चार लाख स्थलांतरित आढळले होते. आता हीच संख्या पाच लाखांवर पोचली. जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधील कष्टकऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी निवाऱ्याची सोय नसलेल्यांची संख्या मोठी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या गावाकडे गेलेल्यांचा अपवाद वगळता इतरांची सोय प्रशासनाला करावी लागणार आहे.  

Image may contain: 1 person, standing, shoes and outdoor

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about lockdown Provincial labour Nashik marathi news