प्रवाशांनो..तुम्हालाही रेल्वे आरक्षण रद्द करायचंय.. मग ही बातमी तुमच्यासाठी

 nashik road railway station 123.jpg
nashik road railway station 123.jpg

नाशिकरोड : लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांनी पूर्वनियोजन केलेल्या रेल्वेचे आरक्षण तिकीट रद्द करण्यास आज 25 मेपासून सुरवात झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पहिल्याच दिवशी सुमारे सहा लाखांचा रिफन्ड करण्यात आला. रेल्वेने ऐन वेळेवर जाहीर केलेल्या पत्रकामुळे अनेक लोकांना माघारी फिरावे लागले. भारतातल्या अनेक रेल्वेस्थानकांवर आरक्षण रद्द करण्यासाठी तोबा गर्दी उडाली. त्यामुळे रेल्वेने ऐनवेळेला घाईगर्दीने काढलेल्या परिपत्रकात तारखेनुसार रेल्वेचे आरक्षण रद्द करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

तारखेपासून सहा महिन्यापर्यंत रिफन्ड मिळणार

प्रवासाच्या तारखेपासून सहा महिन्यापर्यंत रिफन्ड मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी धोका न पत्करता वातावरण सुरळीत झाल्यानंतर रिफन्ड घेण्यास यावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने आरक्षण तिकिट रद्द करुन प्रवाशांचे पैसे परत करण्यासाठी ऐन वेळेवर नियमात बदल केला आहे. काल दिनांक 25 मे रोजी ऐन वेळेला आरक्षण तिकिट रद्द करण्यासाठी वेळापत्रक बनवले आहे. हा बदल 26 मे पासून लागू होईल. बदल पुढीलप्रमाणे.

1) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 22 मार्च 2020 ते दिनांक 31 मार्च 2020 पर्यंतचे आरक्षण तिकीटाचे पैसे 26 मे पासून मिळेल.

2) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 1 एप्रिल 2020 ते 14 एप्रिल पर्यंत. आरक्षण तिकीटाचे पैसे 1 जून पासून मिळेल.

3) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत. आरक्षण तिकीटाचे पैसे 7 जून पासून मिळेल.

4) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत. आरक्षण तिकीटाचे पैसे 14 जूनपासून मिळेल.

5) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 16 मे ते 31मेपर्यंतचे आरक्षण तिकीटाचे पैसे 21 जूनपासून मिळेल.

6) प्रवास सुरू होण्याचा दिनांक 1 जून ते 30 जूनपर्यंतचे आरक्षण तिकीटाचे पैसे 28 जून पासून मिळेल.

प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करु नये

यामध्ये आरक्षण रद्द झालेल्या गाडीचे पैसे प्रवासाच्या तारखेपासून 180 दिवसाच्या (6 महिने) आत मिळणार आहेत. आरक्षण तिकीटाचे पैसे 30 जूननंतरही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करु नये असे आवाहन रेल्वेने केले असून रेल्वे स्थानकात प्रवेश देताना प्रवाशांना मास्क बांधल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे रेल्वेने कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com