महापालिकेतील भाजपच्या सत्तेला ग्रहण...भाजप-मनसेचा नवा पॅटर्न? 

bjp flags 1.jpg
bjp flags 1.jpg

नाशिक : एखाद्या पोटनिवडणुकीमुळे सत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो, याचा अनुभव सध्या महापालिकेतील सत्ताधारी भाजप घेत आहे. प्रभाग 22 मधील पोटनिवडणुकीनिमित्त एकने संख्याबळ घटल्याने नगरसेवकांचे गुणोत्तर प्रमाण लक्षात घेता स्थायी समितीसह विषय समित्या हातून जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनसेचे सत्तेतील महत्त्व वाढले आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महापालिकेत भाजप-मनसेचा नवा पॅटर्न भविष्यात पाहायला मिळणार आहे. 

पोटनिवडणूक परिणाम; स्थायीसह विषय समित्या ताब्यातून जाण्याची शक्‍यता 
2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर 122 पैकी भाजपचे 66 सदस्य निवडून आले होते. त्याखालोखाल शिवसेना 35, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी सात व मनसेचे पाच व रिपाइंचा एक सदस्य होता. महापौर, उपमहापौरांच्या निवडणुकीत सत्ता मिळविताना स्थायी समितीवर गुणोत्तर प्रमाणाच्या आधारे नगरसेवक निश्‍चित करताना 8.66 कोटा होता. त्यानुसार समितीवर नऊ सदस्य नियुक्त होत होते. सोळा सदस्यांच्या तुलनेत बहुमत होते. शिवसेनेचे 4.53 गुणोत्तर होत असल्याने चार, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी 0.93 व मनसेचे 0.80 इतके गुणोत्तर असल्याने प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती स्थायी समितीवर होती. परंतु प्रभाग 22 च्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने तसेच एका नगरसेविकेचे निधन झाल्याने आणखी एक जागा रिक्त होऊन भाजपचे गुणोत्तर प्रमाण घटले आहे. सध्या भाजपकडे 64 सदस्य आहेत. सद्यःस्थिती लक्षात घेता भाजपचे गुणोत्तर प्रमाण 8.46 इथपर्यंत आल्याने स्थायी समितीवर आता नऊऐवजी आठ सदस्य जातील. हेच प्रमाण आरोग्य व वैद्यकीय, विधी, महिला व बालकल्याण तसेच शहर सुधार समितीच्या बाबतीत असल्याने सर्वच समित्यांवर भाजपला एका सदस्याची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या वाढलेल्या गुणोत्तर प्रमाणामुळे सेनेचा एक सदस्य वाढल्याने महाविकास आघाडी म्हणून सहजपणे भाजपकडून सत्ता हिसकावून घेता येणे शक्‍य होणार आहे. भाजपला मनसेने साथ दिल्यास सत्तेची राजकीय खेळी अवघड नाही. 

शिवसेनेला संधी 
पूर्वी 66 सदस्यांमुळे 8.66 गुणोत्तर होते. 0.66 अपूर्णांक अतिरिक्त असल्याने आणखी एक असे नऊ सदस्य स्थायी समितीवर नियुक्त व्हायचे. आता निवडणूक निकालामुळे 8.46 गुणोत्तर आहे. 0.46 अपूर्णांकापुढे शिवसेनेचे 4.53 म्हणजेच 0.53 ही संख्या मोठी असल्याने शिवसेनेचे चारऐवजी पाच सदस्य नियुक्त होतील. म्हणजे विरोधकांचे आठ, तर भाजपचे आठ असे समसमान बलाबल होणार असल्याने यातून शिवसेना सत्तेची संधी साधू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com