बॉशमधील निवृत्त कामगारांभोवती बँकांसोबतच नातलगांच्याही घिरट्या; विविध व्याजदराची प्रलोभनं

bosch c.jpg
bosch c.jpg

नाशिक / सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील स्मार्ट व्यवस्थापन असलेल्या बाॅश कंपनीतील अनेक कामगार व अधिकाऱ्यांनी नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने प्रत्येकाला किमान ९० लाख ते एक कोटीपर्यंत रक्कम मिळाली आहे. त्यामुळे अशा कामगार व अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर राजकीय नेते, फायनान्स व बँकाचे लक्ष असून, गुंतवणुकीवर विविध व्याजदराची प्रलोभनं दाखविली जात आहेत.

आकर्षक व्याजदराचे आमिष
बॉश कंपनीच्या नाशिकमधील प्रकल्पातून साडेचारशेपेक्षा जास्त कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ घेतला आहे. त्या माध्यमातून जवळपास तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच विविध फायनान्स व बॅंकांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळविला. त्याचबरोबर वर्षानुवर्षे फटकून वागणारे, दुरावलेले आणि काहीशा अशाच वृत्तीचे नातेवाईकही आता निवृत्त कामगार, अधिकाऱ्यांकडे चकरा मारू लागले आहेत. बँका, फायनान्सकडून विविध प्रकारचे आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविले जात असून, मार्केटिंगच्या विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. त्याचप्रमाणे काही बिल्डरकडूनही थेट भागीदारीचे आमिष दाखवून लॉकडाउनच्या काळात ही गंगाजळी आपल्या पदरात कशी पडेल, याची व्यूहरचना केली जात आहे. त्याचवेळी नातेवाईक मंडळीही आता आपुलकीने विचारपूस करू लागली आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

सर्वांनाच अचानक पुळका
लाखो रुपये मिळाल्याचे समजताच फायनान्स व बँक दलालांच्या चकरा सुरू झाल्या आहेत. यात, कामगार, अधिकाऱ्यांचे नातेवाईकही मागे नाहीत. अनेक वर्षांत सुख-दुःखाच्या अनेक प्रसंगांत कधीही न विचारणारे भाऊ, काका, जावई आदींसह अन्य जवळच्या नातेवाइकांना आता अचानक पुळका आल्याचे कामगार बोलून दाखवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com