Valentine Day Special : जातीप्रथेकडे फिरवूनी पाठ.. जुळली 'त्यांची' रेशीमगाठ!

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वैभव व नूतनने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर नूतन आदल्या दिवशी घरुन निघून आली. नूतनला माहीत होतं घराचा उंबरा ओलांडल्यानंतर कदाचित आपलं या घरातलं स्थान कायमचं संपेल. परंतू, वैभववर असलेले प्रेम, विश्वास याच्या जोरावर तिने हे पाऊल उचलले.​

नाशिक : निमित्त ठरलं ते पुरोगामी शिबिर कार्यक्रमाचे... कार्यक्रमात भेट झाली अन् नंतर कधी मन जुळले कळालेच नाही. तो बौध्द धर्मीय अन् ती 
सुतार घरचे रुढीपरंपरावादी प्रेम तर झालं पण पुढे खरी परिक्षा होती ती हे प्रेमाला घरची संमतीची...'बाबा, मी लग्न केले असं म्हटल्यानंतर वडीलांनी
मुलगा कोणत्या जातीचा आहे असं विचारल्यानंतर जेव्हा त्यांना सांगितलं. तिथेच "तू आम्हाला मेली" अशी घरचांची प्रतिक्रीया होती.

जुळता - जुळता मन जुळले...!

नूतन महामुनी व वैभव मोरे यांची भेट पुरोगामी शिबिरात झाली. तो मुंबईचा व ती सातारची... पहिल्या भेटीत एकमेकांना अगदी अनोळखी. वैभव हा मुंबईला एका कंपनीत मॅनेजर आहे. तर नूतन ही कवयित्री आहे. दोघांच्या भेटीनंतर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले त्यांचे त्यांनाही कळले नाही.  नूतनच्या घरचे रुढीपरंपरावादी होते,आपल्या मुलीचे लग्न हे आंतरजातीय करावे असा जरासुध्दा त्यांनी विचार केलेला नव्हता. नूतनचे पदवीचे शिक्षण पूर्ण  झाल्यानंतर घरी मुलं बघण्याचे सुरु झाले. वैभवच्या घरी त्यांनी प्रेम असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या घरच्यांनी संमती दिली. परंतू, वैभव तिच्यासाठी किती योग्य आहे, हे सांगून सुध्दा घरचांनी वैभव व नूतनच्या लग्नाला परवानगी दिली नसती. त्यामुळे दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. 

त्यांचा पहिला प्रश्न होता- मुलगा कोणत्या जातीचा
वैभव व नूतनने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर नूतन आदल्या दिवशी घरुन निघून आली. नूतनला माहीत होतं घराचा उंबरा ओलांडल्यानंतर कदाचित आपलं
या घरातलं स्थान कायमचं संपेल. परंतू, वैभववर असलेले प्रेम, विश्वास याच्या जोरावर तिने हे पाऊल उचलले. दोघंही उपवर असल्याने कोर्ट मॅरेज केले.
लग्न केल्यानंतर नूतनने वडीलांना फोन केला. 'बाबा, मी लग्न केले असं म्हटल्यानंतर वडीलांनी मुलगा कोणत्या जातीचा आहे? असे विचारल्यानंतर तिने सगळे सांगितले. तेव्हापासून नूतनच्या घरात तिचे नाव देखील काढले जात नाही. आंतरजातीय विवाह केला म्हणून, 'तू आम्हाला मेली!' अशी नूतनच्या घरच्यांची प्रतिक्रिया आहे.
 
Image may contain: 2 people, people smiling, people sitting, beard and indoor

"पुरुषी मानसिकतेतून न बघता तिला स्वातंत्र्य देतो"

वैभव हा नेहमीच नूतनला स्वातंत्र देतो. तिने शिकावे, नोकरी करावी, परावलंबी राहू नये असे त्याचे विचार आहे. तो तिला पार्टनर म्हणून स्वीकारतांना पुरुषी मानसिकतेतून न बघता तिला स्वातंत्र्य देतो, जगाला बळ देतो. दोघांच्या लग्नाला आता नऊ महिने झाले. वैभवच्या घरच्यांनी देखील नूतनला स्वीकारले, ते तिला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावतात. परंतु कुठेतरी खंत असते की तिच्या घरच्यांनी देखील वैभव व नूतनच्या प्रेमाचा स्वीकार करावा.

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

जाती-धर्माच्या विषमतेला जुगारून फुलले आमुचे प्रेम..!​

प्रेम एक विश्वास आहे, हिंमत, ताकद आहे. योग्य व्यक्ती भेटल्यानंतर नक्कीच कुठेतरी प्रेमाला नवीन आशा व उभारी मिळत असते. वैभवचे असं म्हणणं आहे की, जातीय -धर्मीय विषमतेतून कोणतचं नात अपूर्ण राहणार नाही,ह्यासाठी आम्ही दोघे हे कटिबद्ध राहू! इतर प्रेमीयुगलकांना आमच्यावर ओढवलेल्या संकटांना फेस न करावं लागण्यासाठी आमच्याकडून आजन्म जी मदत करता येईल ती आम्ही करू.

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Valentine day special story Nashik Marathi News