सत्ताधाऱ्यांकडून 'निमा' कार्यालय कुलूपबंद...वाचा नेमके कारण काय?

nima.jpg
nima.jpg

नाशिक/ सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) कार्यालय कोरोनामुळे १४ बंद कुलूपबंद करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला. तर सायंकाळी पदभार स्वीकारण्यासाठी आलेले नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी आशिष नहार व खजिनदार संदीप भदाणे यांनी सॅनिटायझरसह इतर उपायोजना करून कार्यालय लवकर सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला. त्यामुळे निमातील वाद सुरू राहण्याचे संकेत आहेत.

दोन डझन बाउन्सरचा निमा हाउसला वेढा

विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्याने विश्वस्त मंडळाने नेमलेली विशेष कार्यकारी समिती पदभार घेण्यासाठी निमा हाउसमध्ये येणार होती. सत्ताधाऱ्यांनी समितीला बेकायदेशीर ठरवत त्यांना पाऊलही ठेवू देणार नसल्याचा पवित्रा सत्ताधारी गटाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २) निमा हाउसमध्ये काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. एका गटाच्या मागणीवरून सकाळी नऊपासूनच दोन पोलिस आणि दोन डझन बाउन्सरचा निमा हाउसला वेढा होता.

निमा हाउस १४ दिवस बंद

सत्ताधारी ‘निमा’चे काळजीवाहू अध्यक्ष शशिकांत जाधव, जनरल सेक्रेटरी तुषार चव्हाण, श्री. महाजन, श्री. पेशकर, उदय रकिबे आदींनी निमा हाउसमधील काही कर्मचारी तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना कोरोना झाल्याने त्यांच्या संपर्कातील त्यांचे बंधू कैलास आहेर निमात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून निमा हाउस १४ दिवस बंद ठेवले जात असल्याचे जाहीर करीत, निमा हाउसला कुलूप लावले. निमा कार्यकारिणीने महापालिका व सातपूर पोलिसांनाही त्याविषयी माहिती दिली.

हा वाद अजून टोकाला जाणार

निमा हाउसच १४ दिवस बंद राहणार असल्याने निमातील वादही १४ दिवस थंड राहील, असे वाटत असतानाच सायंकाळी पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या विश्वस्त मंडळाने नियुक्ती केलेल्या नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी आशिष नहार व खजिनदार संदीप भदाणे, हर्षद ब्राह्मणकर, राजेश गडाख, मनीष रावल यांनी निमाचे कुलूप पाहून निमा हाउस महापालिकेकडून सॅनिटायझरसह इतर सर्व उपायोजना करून कार्यालयात लवकरच कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला. त्यामुळे हा वाद अजून टोकाला जाणार, असे संकेत दोन्ही गटांकडून मिळत आहेत.

निवडणूक घ्यावी. याविषयी जिल्हाधिकारी व धर्मदाय आयुक्तांना पत्र दिले होते, पण कोरोना आणि निवडणुकांना स्थगिती आली तरीही विश्वस्त मंडळाने निवडणूक समिती जाहीर केली. समितीला सहकार्य करत असताना आम्हाला कॅबिनमधून बाहेर काढण्याचे फर्मान काढले हे चुकीची प्रथा विश्वस्त मंडळाने व निवडणूक कमेटीने केल्याने या वादाला सुरवात झाली. मुदत संपली म्हणून नवीन कार्यकारिणी येईपर्यत काळजीवाहू न ठेवता नवीन समिती जाहीर करून कुरघोडी करणे चुकीचे आहे. - तुषार चव्हाण, काळजीवाहू जनरल सेक्रेटरी, निमा

सध्याच्या कमिटीचा कार्यकाळ संपल्याने विवेक गोगटे यांच्या मदतीसाठी माझी व संदीप भदाणे यांची विश्‍वस्त मंडळाने नियुक्ती केली. त्यामुळे मी व भदाणे निमाचा कारभार घेण्यासाठी आलो; पण कार्यालयाला बेकायदेशीर सील केल्याचे आढळून आले. कोरोना झाला असेल, तर उपाययोजना करून कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. - आशिष नहार, नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com