डोळ्यादेखत स्वप्नांची राखरांगोळी! वीज वितरणाचा गलथान कारभार; नऊ एकर ऊस जळून खाक

sugarcane burn.jpg
sugarcane burn.jpg

डांगसौंदाणे (जि.नाशिक) : सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील डांगसौदाणे शिवारातील दिगंबर बोरसे यांचा  सात एकर, तर वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊस बुधवारी (ता.४) आग लागून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोघा शेतकऱ्यांचे दहा लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे. 

दहा लाखांपेक्षा अधिक नुकसान
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावर एस्सार पेट्रोलपंपासमोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबीयाच्या नावे बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील एक हेक्टर, पत्नीच्या नावे असलेले ८६ आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी आडसाली उसाची लागवड केली असून, आता थोड्याच दिवसांत कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आजच्या आगीत संपूर्णपणे खाक झाला. तर या उसाला केलेले ठिबक सिंचन ही जळाले आहे. याच क्षेत्रालगत असलेला वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊसही जळाल्याने त्यांचेही चार लाखांचे नुकसान झाले. या उसाबरोबरच ठिबक सिंचनही संपूर्णपणे जळाले आहे. 

जीव गेल्यास याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांकडून संतप्त सवाल
बोरसे यांच्या शेतात वीज वितरण कंपनीच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्णपणे लोंबकळल्याने बोरसे यांनी वीज वितरणचे स्थानिक कर्मचारी अणि अधिकाऱ्यांना याची कल्पनाही दिली होती. मात्र नेहमीच्या सवयींप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने आजचे नुकसान घडून आल्याचा आरोप होत आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून, असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्याकडून घेतली जात नसल्याने वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उद्या कोणाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. या नुकसानीची पाहणी वीज वितरणच्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांनी केली असून स्थानिक तलाठी आतिश कापडणीस यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठांना माहिती देत पंचनामा केला. 

माझे आज दहा लाखांचे नुकसान झाले. हंगाम सुरू होताच हा ऊस कारखान्याला गाळपसाठी जाण्यासाठी सज्ज असताना आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने आज मोठे नुकसान झाले. यामुळे नुकसानभरपाई मिळावी. - दिगंबर बोरसे, शेतकरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com